आस्थापना

.

भूमि अभिलेख विभागातील पदांचा तपशील
अ . क्र . शासन निर्णय क्र्रमांक व दिनांक मंजूर पदे एकूण शेरा
गट अ गट ब गट क गड ड
पदसमूह 1 पदसमूह 2 पदसमूह 3 पदसमूह 4 वाहन चालक दप्तरबंद शिपाई
1 क्र . आस्थापना 1093/ प्र . क्र 19/ ल -1 दि .18/8/1994 49 400 332 534 1392 4172 48 360 2184 9471
2 क्र . आस्थापना 2001/ प्र . क्र 273/ ल -1 दि .20/10/2003 4 -57 8 -33 4 90 पदे समपिर्त व 4 नवनिमिर्त जिल्हयासाठी 16 पदे नव्याने निमिर्त
सन 2003 अस्तित्वातील आस्थापना 53 400 275 542 1392 4139 48 360 2188 9397
3 क्र . आस्था 1002/ प्र . क्र .111/ ल -1 दि .10/1/2007 -271 271 स . ता . नि . भू . अ . ची 271 पदे पदसमूह 2 मध्ये शिरस्तेदार पदनामाने रुपांतरित
अस्तित्वातील आस्थापना 53 400 4 813 1392 4139 48 360 2188 9397
4 क्र . आस्था 1000/184/ प्र . क्र .155/ ल -1 दि .29/7/2008 0 32 0 0 0 160 0 32 64 288 नवनिमिर्त 32 तालुक्यांसाठी 288 पदे नव्याने निर्माण
अस्तित्वातील आस्थापना 53 432 4 813 1392 4299 48 392 2252 9685

आस्थापना विषयक माहिती

जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (म.राज्य ) पुणे हे पद भूमि अभिलेख विभाग प्रमुख पद आहे. त्यांची कर्तव्ये खालील प्रमाणे आहेत.
 • विभागातील भूमि अभिलेखाचे संगणकीकरणासाठी वेळोवेळी देणेत येणा-या सुचनेप्रमाणे / आदेशाप्रमाणे कार्यवाही करणे
 • सर्व्हेक्षणाकामी देणेत येणा-या आधुनिक उपकरणांचा प्रत्यक्ष वापर करुन घेणे. व अधिनस्त कार्यालयास परवानगी देणे
 • नगर भूमापन अधिकारी (शहर)यांचे कार्यालयाची वार्षिक तपासणी विभागातील अशा कार्यालयापैकी टक्के कार्यालयाची तपासणी करणे.
 • हद्द कायम व भुसंपादन प्रकरणाची गुणवत्तेच्या दृष्टीकोनातुन तपासणी करणे
 • आस्थापना विषयक अपील प्रकरणे (विभागीय चौकशी) शक्यतो 3 महिन्यात निकाली करणेची आहेत.
 • वर्ग-2 अधिकारी यांचे नियुक्तीचे अधिकार आहेत त्यानुसार वर्ग-1 व वर्ग-2 चे कर्मचा-यांवर विभागीय चौकशी करुन महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त) 1979 चे नियम 8 व 10 खाली शिक्षा करणे
 • नियंत्रणाखालील उ. सं. भू. अ./जि. अ. भू. अ./ उ. अ. भु. अ/न. भू. अ. कार्यालयाची तपासणी / निरिक्षण दरवर्षी करणे /कामाची तपासणी करणे.
 • भूमि अभिलेख जतन करणेचे दृष्टीने शासनाकडील सुचनेप्रमाणे कार्यवाही करणे त्याबाबत अधिनस्त कार्यालयास सूचना देणे व पुरविलेल्या सयंत्राचा पुरेपुर वापर करणे.

उपसंचालक भूमि अभिलेख संलग्न जमाबंदी आयुक्त ( सर्वसाधारण ) पुणे यांचे कर्तव्ये

आस्थापना / लेखा विषयी सर्व कामकाजाबाबत मा.जमाबंदी आयुक्त, पुणे निर्देश/सूचना देतील त्याप्रमाणे काम करणे

उपसंचालक भूमि अभिलेख संलग्न जमाबंदी आयुक्त ( भूमापन, पुनर्मोजणी ) पुणे यांचे कर्तव्ये

भूमापन, पुनर्मोजणी विषयी सर्व कामकाजाबाबत मा.जमाबंदी आयुक्त, पुणे निर्देश/सूचना देतील त्याप्रमाणे काम करणे

उपसंचालक भूमि अभिलेख संलग्न जमाबंदी आयुक्त (नागरी भूमापन) पुणे यांचे कर्तव्ये

नगर भूमापन, राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमाविषयी विषयी सर्व कामकाजाबाबत मा.जमाबंदी आयुक्त, पुणे निर्देश/सूचना देतील त्याप्रमाणे काम करणे

उपसंचालक भूमि अभिलेख संलग्न जमाबंदी आयुक्त (एकत्रीकरण ) पुणे यांचे कर्तव्ये

एकत्रीकरण प्रकरणा विषयी सर्व कामकाजाबाबत मा.जमाबंदी आयुक्त, पुणे निर्देश/सूचना देतील त्याप्रमाणे काम करणे

जमाबंदी आयुक्त कार्यालयातील कार्यालय अधीक्षक यांचे कर्तव्ये खालीलप्रमाणे

मा.जमाबंदी आयुक्त, पुणे निर्देश/सूचना देतील त्याप्रमाणे काम करणे

विभागातील सर्व उपसंचालक भूमि अभिलेख यांचे कर्तव्ये खालीलप्रमाणे

 • विभागातील भूमि अभिलेखाचे संगणकीकरणासाठी वेळोवेळी देणेत येणा-या सुचनेप्रमाणे/आदेशाप्रमाणे कार्यवाही करणे
 • सर्व्हेक्षणाकामी देणेत येणा-या आधुनिक उपकरणांचा प्रत्यक्ष वापर करुन घेणे.
 • नगरü भूमापन अधिकारी (शहर)यांचे कार्यालयाची वार्षिक तपासणी विभागातील अशा कार्यालयापैकी 50टक्के कार्यालयाची तपासणी करणे.
 • हद्दü कायम व भुसंपादन प्रकरणाची गुणवत्तेच्या दृष्टीकोनातुन तपासणी करणे.
 • दरमहा कमीत कमी 10 अपील प्रकरणे अग्रक्रमाने निकाली काढावीत.
 • आस्थापना विषयक अपील प्रकरणे (विभागीय चौकशी) शक्यतो 3 महिन्यात निकाली करणेची आहेत.
 • वर्ग 3 नियुक्तीचे अधिकार आहेत त्यानुसार वर्ग-3 व वर्ग-4 चे कर्मचा-यांवर विभागीय चौकशी करुन महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त) 1979 चे नियम 8 व 10 खाली शिक्षा करणे.
 • नियंत्रणाखालील कमीत कमी 1/4ता.नि.भु.अ कार्यालयाची तपासणी / निरिक्षण दरवर्षी करणे तसेच अ.भु.अ कार्यालय, जास्तीत जास्त प.भु यांचे कामाची तपासणी करणे.
 • वि ता नि भू अ (शहर) कार्यालयाचे कामाची तपासणी करणे.
 • भूमि अभिलेख जतन करणेचे दृष्टीने मा.जमाबंदी आयुक्त,पुणे यांचे सुचनेप्रमाणे कार्यवाही करणे व पुरविलेल्या सयंत्राचा पुरेपुर वापर करणे.
 • उपसंचालक भूमि अभिलेख यांनी वर्षातुन 120 दिवस फिरती व 80 दिवस रात्रीचे मुक्काम करावयाचे आहेत.

विभागातील सर्व जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख संलग्न उपसंचालक भूमि अभिलेख यांचे कर्तव्ये खालीलप्रमाणे

 • उपसंचालक भूमि अभिलेख कार्यालयातील समस्त तांत्रिक कामावर नियत्रण ठेवणे व प्रकरणे सत्वर निकाली काढणेच्या दृष्टीने उपसंचालक भूमि अभिलेख यांना मदत करणे.
 • विभागीय पदोन्नती समितीचे सदस्य म्हणून कर्तव्य बजविणेची आहेत.
 • वर्ग 4 कर्मचा-याचे भरतीकरीता विभागीय पदोन्नती समितीमध्ये पदसिध्द सभासद म्हणुन कार्यवाही करणेची आहे.
 • उपसंचालक ú भूमि अभिलेख,कार्यालयात विभागीय चौकशीचे कामकाजाकरीता नियंत्रण अधिकारी म्हणुन काम पहातील.
 • जि. अ.भू .अ. संलग्न यांनी विभागातील 15 हद्य कायम मोजणी प्रकरणे / भूसंपादन 15 क.जा.प यांची एका वर्षात तपासणी करणेची आहे.
 • विभागातील वर्ग-4 मधील कर्मचा-यांच्या बदल्या संबधीत जिल्हयातल्या जिल्हयातच करणेच्या आहे.

विभागातील कार्यालय अधीक्षक , उपंसंचालक भूमि अभिलेख यांचे कर्तव्ये खालीलप्रमाणे

 • उपसंचालक भूमि अभिलेख निर्देश देतील त्यानुसार काम करणे / करवुन घेणे
 • विभागीय पदोन्नती तीचे सचिव म्हणुन काम करणे.
 • वर्ग -3 व वर्ग- 4 कर्मचा-याचे बदलीचे प्रस्ताव तयार करणे.
 • उपसंचालक भूमि अभिलेख कार्यालयाचे आहरण व संवितरण अधिकारी म्हणून काम करणे.
 • उपसंचालक भूमि अभिलेख कार्यालयातील कर्मचा-यावर नियत्रण ठेवणे प्रगतीचा आढावा घेणे.

विभागातील सर्व जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख यांचे कर्तव्ये खालीलप्रमाणे

 • म ज म अ 1966 मधील विधी नियमात नेमुन देण्यात आलेली कामे नेहमीप्रमाणेच पार पाडणेची आहेत.
 • सर्व जि.अ.भू.अ,संवर्गातील अधिकारी जमीन एकत्रीकरण योजना कायदा 1947 मधील तरतुदीनुसार विधीवत एकत्रीकरण अधिकारी म्हणुन पार पाडतील.
 • जि.अ.भु.अ यांनी वर्षात 170 फिरतीचे दिवस आणि 100 रात्रीचे मुक्काम साध्य करणेचे आहेत.
 • जि.अ.भु.अ यांनी त्यांचे अधिनस्त कार्यक्षेत्रातील सर्व कार्यालयाची वार्षिक तपासणी करावी.
 • हद्द कायम, भुसंपादन,नगर भुमापन मोजणी प्रकरणे अशी मिळुन वर्षात कमीत कमी 60 प्रकरणे तपासणी करणेची आहेत.
 • जि.अ.भु.अ यांनी त्यांचे अधिनस्थ जिल्हयातील परिरक्षण भुमापकांपैकी 25%परिरक्षण भुमापकांचे कामाची तपासणी करणेची आहे.
 • जिल्हयातील नगर भूमापनाकडील दुर्बिण मोजणी काम, सविस्तर मोजणी काम गणित काम, सनद मिळकत पत्रिका लिहिणे इत्यादी कामाची 1% तपासणी करावी.
 • जिल्हयात चालु असणा-या विस्तारीत नगर भूमापनकरच्या सर्व स्तरावरील कामाची एकुण कामाच्या 5% तपासणी काम करणेचे आहे.
 • सर्व्हेक्षण /अभिलेख जतन करणेसाठी पुरवठा करणेत आलेल्या यंत्र सामुग्रीसंबधी प्रशिक्षीत व कर्मचा-यावर देखरेख ठेवणे.
 • उपजिल्हाधिकारी,तहसिलदार यांना प्रशिक्षण देणे व परीक्षा घेणे.
 • पुनर्लेखन कामाची तपासणी 3% करावी.
 • पर्यवेक्षीय कर्मचा-यांनी / अधिका-यांनी तपासणी केलेल्या कामाची कमीत कमी 10% तपासणी करावी.

विभागातील सर्व उपअधीक्षक भूमि अभिलेख यांचे कर्तव्ये खालीलप्रमाणे

 • उपअधीक्षक भूमि अभिलेख हा जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख यांच्या नियत्रणाखाली काम करील.
 • जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख यांना सर्व प्रकारच्या तांत्रिंक बाबीमध्ये दुय्यम राहील.
 • भूमापक व परिरक्षण भूमापक यांनी केलेल्या मोजणी कामाची तपासणी करुन नियत्रंण ठेवील.आणि तो या कामास जबाबदार राहील.
 • भूमापन कार्यालयातील कामातील अचुकपणा व वक्तशीरपणा याबाबत तो जबाबदार असेल.
 • कमी जास्त पत्रके मंजुर करील व त्याप्रमाणे भूमि अभिलेखात वाजवी ती दुरुस्ती करुन घेईल व त्यास जबाबदार राहील.
 • तांत्रिंक बाबीमध्ये अ.भू.अ यांचेकडे येणा-या इतर महसुल अधिका-यांना मार्गदर्शन करेल.
 • दुर्बिण कामाची व नकाशाची तपासणी करणे ,परिरक्षणासाठी असलेल्या नगर भूमापनाची टिपणी तयार करुन जि.अ.भू.अ यांना सादर करील.
 • निमताना प्रकरणे स्विकारणे व अनुषगीक कार्यवाही करणे.
 • एकत्रीकरण योजनेवरील तक्रारी अर्जाची चौकशी करुन तक्रारी अर्जाची निपटारा करण्यास जबाबदार असेल.
 • वर्षामध्ये 150 फिरतीचे दिवस आणि 55 रात्रीचे मुक्काम साध्य करणेचे आहे.
 • शासनाकडील परपित्रके तसेच म.जमाबंदी आयुक्त,पुणे यांचेकडील परिपत्रकान्वये वेळोवेळी दिलेल्या सुचनेप्रमाणे कार्यवाही व कामकाज करण्याचे आहे.

नगर भूमापन अधिकारी यांची कर्तव्ये

 • परिरक्षण भूमापक यांनी केलेल्या नगर भूमापन हद्दीतील मिळकतींच्या तसेच पोटहिस्सा मोजणी कामाची तपासणी करणे.
 • पोट-हिस्सा मोजणीच्या कार्यालयाची पूर्णपणे तपासणी करणेची आहे.
 • पुनर्विलोकन कामाची तपासणी करणे.
 • फेरफार नोंदणी मंजूर करणे.
 • विवादग्रस्त फेरफार नोंदी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966 मधील तरतुदींनुसार व नियमानुसार मंजूर करणे.
 • मंजूर झालेल्या नगर रचना योजनांचा नगर भूमापन अभिलेखास अंमल देणे.
 • सरकारी / नगरपालिका / ग्रामपंचायत जागेवरील अतिक्रमणाचे प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह सक्षम महसूल अधिकारी यांचेकडे पाठविणे व त्यास मंजूरी प्राप्त करणे व त्या अनुषंगाने पुढील कारवाई करणे.
 • बारनिशी प्रकरणांचा (प्रलंबित / प्रतिक्षाधिन) निपटारा करुन घेणे.
 • नगर भूमापन हद्दीतील मिळकतींच्या वापरात / उपयोगात बदल आढळून आल्यास बिनशेती सारा आकारणीचे प्रस्ताव तयार करुन त्यास मंजूरी प्राप्त करुन घेणे व त्याबाबतच्या बिनशेती सा-याच्या वसुलीवर लक्ष ठेवणे.
 • समयोत्तर दंड वसुल करणे.
 • संयुक्त नकाशामध्ये महत्वाची ठिकाणे दाखवून घेणे व संयुक्त नकाशा अद्यावत करणे.
 • ज्या शेती मिळकतींचे विना परवाना बिनशेती उपयोग आढळून आला आहे अशा मिळकतींचा शोध घेवून त्यावर बिनशेती सा-याची दंडनीय रकमेसह आकारणी करुन तसे प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी महसूल अधिकारी यांचेकडे पाठविणे.
 • ज्या मिळकतीचे हमीची मुदत संपलेली आहे.त्यांची मुदत वाढविणे कामी प्रस्ताव तयार करुन ते महसूल अधिकारी यांचेकडे पाठविणे.त्यास मंजूरी प्राप्त करुन घेणे व त्यानुसार नगर भूमापन अभिलेखास अंमल देणे.
 • गावठाण नंबर 1,2,3 व 4 अद्यावत आणणे.
 • ज्या पुनर्विलोकन आलेखात 25 टक्केपेक्षा जास्त अधिकृत दुरुस्ती झालेल्या आहेत असे आलेख स्वत:च्या व नियंत्रण अधिकारी यांचे तपासणी अंती छपाईसाठी पाठवून देणे.
 • सिटी सर्व्हे मॅन्युअलमधील "फॉर्म ऑफ इन्स्पेक्शन मेगोरँडम ऑफ दि सिटी सर्व्हे ऑफीस " मध्ये नमूद केलेल्या बाबीसंबंधी कार्यवाही केली जाते अगर कसे याची पडताळणी करणे.
 • जमाबंदी आयुक्त आणि संचालक,भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य) पुणे यांनी वेळोवेळी परिपत्रकान्वये दिलेल्या / दिल्या जाणा-या सूचनांप्रमाणे कार्यवाही करणे.

विशेष उप अधीक्षक भूमि अभिलेख तथा चौकशी अधिकारी यांची कर्तव्ये

 • महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 कलम 122 व 126 च्या अधिसूचना विशेष उप अधीक्षक भूमि अभिलेख (नगर भूमापन) कार्यालयाकडुन प्राप्त करुन घेणे.
 • चौकशी काम करणेपूर्वी संबंधीत गावची लोकसंख्या 2000 पेक्षा अधिक आहे याची खात्री जनगणना पुस्तक / आवश्यकत्या अभिलेखांवरुन खात्री करणेची आहे.
 • नगर भूमापन चौकशी करताना चौकशी नोंदवहीतील पहिले 1 ते 4 रकाने सविस्तर भूमापक यांनी व्यवस्थित दिल्या भरल्याची व तसेच त्या मिळकतीचे क्षेत्र काढले बाबतची वसलेवार पुस्तके प्राप्त करुन घेणे.
 • नगर भूमापन हददीतील मिळकतींची महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 चे कलम 20(2) नुसार व या संबंधी तयार करणते आलेल्या नियमानुसार चौकशी करणे.
 • चौकशी निर्णयात ज्या मिळकतींच्या हद्दीत बदल केला आहे त्यांचे वसलेवार व अन्य संबंधित कागदपत्र तयार करणे.
 • चौकशी केलेल्या मिळकतींच्या निर्णयासंबंधीच्या नोटीशीचे संबंधित मिळकत धारकांना बजाविणे.
 • नगर भूमापन चौकशी सुरु करणेपूर्वी संबंधीत गावास सर्वसाधारण जाहिर नोटिस पाठवून नगर भूमापन चौकशी काम सुरु केले जाणार आहे हयाबाबत पूर्व सूचना देणे.
 • ज्या मिळकतींची नगर भूमापन चौकशी करणेची आहे त्या बाबतची नोटीस संबंधीत धारकांस 10 दिवस आगावू देणे.
 • चौकशी अधिकारी यांनी कलम 20 (2) खाली जी चौकशी करावयाची आहे त्या चौकशीचे स्वरुप आहे.
 • ज्या मिळकतीचे चौकशी काम करावयाचे आहे त्यांची प्रत्यक्ष जागेवर तपासणी करुन सविस्तर भूमापकाने सदर मिळकतींचा काढलेला नकाशा तसेच क्षेत्र बरोबर आहे काय ? हयाची खात्री करणे व आढळुन आलेल्या दुरुस्त्या नियमानुसार दुरूस्त करणे.
 • चौकशीचे काम झालेवर मूळ आलेखातील मिळकतींना अंतिम नगर भूमापन क्रमांक नमुद करणे, तसेच ते चौकशी नोंदवहीत देखील नमुद करणे.
 • अंतिम अहवाल तयार करणे.
 • चौकशी काम करताना चौकशी नोंदवहीत संबंधीत मिळकतींची बाजारभावाप्रमाणे किंमत तसेच क्षेत्र व किंमतीचे युनिट चौकशी नोंदवहीत नमुद करणे.
 • प्रतीमहा केलेल्या कामाची दैनेदिनी व प्रगती अहवाल 5 तारखेपर्यंत नियंत्रण अधिकारी यांना सादर करणे.
 • चौकशी काम पूर्ण झालेवर खालील नोंदवहया दोन प्रतीत तयार करणे.
 • सरकारी मिळकतींची नोंदवही.
 • सरकारी जागेवर झालेल्या अतिक्रमणाबाबतची नोंदवही.
 • ग्रामपंचायत, नगर परिषद जागेवर झालेल्या अतिक्रमणाची नोंदवही.
 • बिगर परवाना बिनशेती वापरात असलेल्या मिळकतींची नोंदवही.
 • अनाधिकृत खरेदी, भाडेपटटा झालेल्या मिळकतीबाबची नोंदवही.
 • शर्त भंगाची माहिती देणारी नोंदवही.
 • सिटी सर्व्हे मॅन्युअल मधील तरतुदी विचारात घेवून चौकशीचे कामकाज करणे.
 • जमाबंदी आयुक्त अणि संचालक भूमि अभिलेख (म.राज्य) पुणे यंानी वेळोवेळी परिपत्रकांन्वये दिलेल्या / दिल्या जाणा-या सूचनांप्रमाणे कार्यवाही करणे.

मुख्यालय सहाय्यक यांची कर्तव्ये

 • कार्यालयात प्राप्त झालेला डाक संकलनाप्रमाणे विल्हेवाट करणे.
 • हजेरीपत्रक, उशीरा येणा-या कर्मचा-यांचे हजेरी पत्रक, हालचाल रजिस्ट्रर व वरिष्ठ अधिका-यांची भेट- पुस्तिका संधारण करणे.
 • सनद फी, नक्कल फी, नकाशा विक्री फी स्विकारणे , संबंधित नोंदवहया संधारण करणे आणि आलेली फीची रक्कम चलनाव्दारे खजिन्यात जमा करणे.
 • नकला , नकाश विक्रीबाबत पावती पुस्तक सांभाळणे व अर्जदार यांना पावती देणे व नोंदवही संधारण करणे.
 • मोजणी अर्जावरील सर्व मोजणी फी चे चलन मंजूर करणे व चलन रजिस्ट्रर ठेवणे.
 • सर्व कर्मचा-यांचे सेवापुस्तक अद्यावत ठवेणे.
 • रोख नोंदवही संधारण करणे , रोखपेटी सांभाळणे व रोख वाटप करणे.
 • वैयक्तिक पंजी, जमानत नामे सांभाळणे व त्याबाबत जरूर ती कार्यवाही करणे.
 • आस्थापना विषयक पंजी ठेवणे.
 • अल्प बचत , पास बुके सांभाळणे , रक्कम वसूल करणे व पोस्टात जमा करणे.
 • राष्ट्रीय ध्वज.
 • अभिलेखागारावर संपूर्ण नियंत्रण ठेवणेचे काम व अभिलेखा संबंधिचे सर्व नोंदवहया अद्यावत ठेवणेची जबाबदारी राहिल.
 • रजा मंजूर प्रकरणे हाताळणे.
 • वेतनवाढ मंजूरी प्रकरणे हाताळणे.
 • आस्थापना बाबत नियकालीक विवरणे .
 • वर्ग 3 व वर्ग 4 चे श्रेणीवार यादीबाबत पत्रव्यवहार
 • उप अधीक्षक भूमि अभिलेख यांचे कार्यालयातून देण्यात येणा-या अभिलेखाच्या प्रमाणित नकलेवर स्वाक्षरी करण्याची जबाबदारी पार पाडेल.
 • उप अधीक्षक भूमि अभिलेख यांचे कार्यालयात प्राप्त होणारे टपाल, पत्रव्यवहार हाताळणे, उत्तर देणे , संदर्भ निकाली काढणे या कामाची जबाबदारी त्यांचेवर राहिल.
 • उप अधीक्षक भूमि अभिलेख हे वेळोवेळी ठरवून देतील ती कामे / कर्तव्ये पार पाडणे.

उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयातील शिरस्तेदार या पदाची कर्तव्ये.

 • भूकरमापकाचे सर्व प्रकारच्या मोजणी कामाची 20 % तपासणी करणे.
 • गावठाण परिरक्षण भूमापक यांचे मोजणी / पुनर्विलोकन कामाचे 20 % प्रमाणे तपासणी करणे.
 • अपील प्रकरणे कोर्ट प्रकरणे सी.पी.सी.ची नोटीस (तांत्रिक विभागाकडील) इत्यादी प्रकरणे हाताळणे.
 • वरीष्ठ कार्यालयाचे सभेची माहिती संबंधीत शाखेकडून तयारी करुन घेवून सादर करणे.
 • आंतरराज्य सीमा / प्रशासकीय सीमा टोपोशीटस तपासणी करुन सादर करणे.
 • प्रादेशिक फेरबदलाबाबत पत्रव्यवहार.
 • वार्षिक ऋ तु / पिके अहवाल तयारी करुन संबंधीत विभागाकडे सादर करणे.
 • परिविक्षाधिन अधिकारी (महसूल व भूमि अभिलेख) यांचे प्रशिक्षण फाईल हाताळणे.
 • लिपीक/निमतानदार यांचे दप्तर तपासणीचे फाईल हाताळणे.
 • कमी-जास्त पत्रक तयार करणे.
 • पुनर्मोजणी योजनेतील मोजणी झालेली सदोष असलेली गावे तपासणी करुन अभिलेख अद्यावत करणे.
 • महसूल अधिकारी/कर्मचारी यांना अभिलेखांचे व इतर प्रशिक्षण देणेचे कर्तव्य पार पाडणे.
 • कार्यालयीन मासिक सभेची व्यवस्था करणे. सभेचे कार्यवृत्तांत लिहीणे व वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करणे.
 • भूमि अभिलेख अर्हता परीक्षा व सेवा प्रवेशोत्तर परीक्षा, उजळणी वर्ग इ. बाबतची माहिती ठेवणे व नस्ती हाताळणे.
 • उप अधीक्षक भूमि अभिलेख यांचे कार्यालयातील कर्मचा-यांना कामाचे वाटप करणे, केलेले काम जमा करुन घेणे.अभिलेखागारात ठेवणेची त्यांची जबाबदारी राहील.
 • उप अधीक्षक भूमि अभिलेख हे ठरवून देतील ती कामे/ कर्तव्ये पार पाडणे.

निमतानदार क्रमांक 1 यांची कर्तव्ये

 • कोर्ट वाटप, कोर्ट कमिशन प्रकरणात मोजणी करणे, सिलींग वाटप व त्यासंबंधीचा पत्राव्यवहार करणे.
 • मोजणी वरील तक्रारी अर्जावर चौकशी करून अहवाल सादर करणे / निपटारा करणे.
 • भूमापक/ छाननी लिपीक यांचे माहेवार तयार करणे.
 • मोजणी प्रकरणाचा वाषिर्क जंगल कार्यक्रम व बरसात कामाचा वाषिर्क कार्यक्रम तयार करून सादर करणे.
 • पोटहिस्सा तक्रारी अर्जावरील चौकशीचे काम व प्रस्ताव तयार करणे.
 • भूसंपादन व भूसंपादन व्यतिरिक्त कमी जास्त पत्रकाबाबतची नोंदवही संधारण करणे, प्रकरणे वाटप करणे, कमी जास्त पत्रक मंजूर करून घेणे, कमी जास्त पत्रकाची एक प्रत संबंधित तहसिलदार व एक प्रत अभिलेखागारात आकारबंदास शिवणेसाठी पाठविणे व कमी जास्त पत्रका संबंधी पत्रव्यवहार.
 • एकत्रिकरण योजनेवरील तक्रारी अर्जाची चौकशी करणे, शुध्दीपत्रक दुरूस्ती योजनेची कागदपत्रे तयार करणे.
 • पर्यवेक्षक यांनी वर्षामध्ये 120 दिवस फिरतीचे दिवस व 80 रात्रीचे मुक्काम साध्य करणेचे आहे.
 • उप अधीक्षक भूमि अभिलेख हे वेळोवेळी ठरवून देतील ती कामे / कर्तव्ये पार पाडणे.

निमतानदार क्रमांक 2 यांची कर्तव्ये

 • नगर भूमापन दुरूस्तीचे प्रस्ताव तयार करून वरिष्ठांकडे सादर करणे.
 • परिरक्षण भूमापक यांचे कामाचा वाषिर्क कार्यक्रम तयार करून सादर करणे.
 • परिरक्षण भूमापक यांचे दप्तराचे तपासणी करून काढलेल्या टिपणीचे अनुपालन अहवाल प्राप्त करून घेणे व पत्रव्यवहार करणे.
 • परिरक्षण भूमापक यांचे एकत्रित माहेवार तयार करणे.
 • परिरक्षण भूमापक यांची अर्जाप्रमाणे चौकशी करून प्रस्ताव तयार करणे व सादर करणे तसेच पुर्नमोजणी दुबार कामची भूमापकाकडून पुर्तता करून घेणे.
 • पुर्नमोजणी योजनेची शिल्लक असलेल्या गांवाच्या पुर्नमोजणी कामाची तपासणी.
 • पर्यवेक्षक यांनी वर्षामध्ये 120 फिरतीचे दिवस व 80 रात्रीचे मुक्काम साध्य करणेचे आहे.
 • दुबिर्ण मोजणी काम करणे.
 • उप अधीक्षक भूमि अभिलेख हे वेळोवेळी ठरवून देतील ती कामे / कर्तव्ये पार पाडणे.

परिरक्षण भूमापक यांची कर्तव्ये

 • स्वयंसूची पध्दतीनुसार अभिलेख ठेवणे.
 • बारनिशी विहित नमुन्यात ठेवणे.
 • अ,ब,क,ड यादीनुसार अभिलेखाचे वर्गीकरणे करणे.
 • नगर भूमापन हद्दीतील शेती भूमापन क्रमांकाची कमी पत्रके धारीका स्वतंत्र ठेवणे.
 • नगर भूमापन हद्दीतील भूमापक क्रमांकाची टिपणे ठेवणे.
 • पुनविर्लोकन काम विहित परिमाणानुसार साध्य करणे.
 • दुबिर्ण दगडांची पाहणी करणे.
 • समयोत्तर शुल्क नोंदवही अद्यावत ठेवणे.
 • नगर भूमापन योजनेनुसार अभिलेख दुरूस्त करणे.
 • पोटहिस्सा नोंदवही ठेवून मोजणी शुल्क वसूल करणे/ मोजणी करणे.
 • शासकिय भूखंडाच्या नोंदी नोंदवहीत अद्यावत ठेवणे.
 • दुय्यम निबंधकाकडून प्राप्त झालेल्या नोंदणी उता-यांच्या नोंदी घेणे.
 • दुवा तुटलेली प्रकरणे निपटारीत करणे.
 • मिळकतीचे सामिलीकरण करणे.
 • अनधिकृत बिनशेती वापराची प्रकरणे शोधून त्याचा अहवाल सादर करणे/ नोंदवही ठेवणे.
 • शासकिय / नगर परिषद/ ग्राम पंचायत जागेवरील अतिक्रमणाबाबतची प्रकरणे शोधणे/ नोंदवही ठेवणे व तत्संबधी पुढील कार्यवाही करणे.
 • यंत्र क्रमांकीत मिळकत पत्रिकांचा हिशोब ठेवणे.
 • कार्यालयात जमा होणा-या रकमेचा हिशोब ठेवणे.
 • गांव नमुना नंबर 2, 3 , 4 परिरक्षीत करणे.
 • अभिलेखांच्या नकला पुरविणे.
 • नगर भूमापनाचे अनुषंगाने भूमापन नियम पुस्तिकेत विहित केलेल्या कार्यपध्दतीनुसार अनुषंगिक कर्तव्ये पार पाडणे.
 • गांवठाणातील मिळकतीचे तसेच नगर भूमापन परिसिमेतील मिळकतीचे उपयोगातील बदलाप्रमाणे व ज्या मिळकतीचे बिनशेती सा-याची मुदत संपलेली असेल अशा मिळकतीवर प्रमाणित दाराप्रमाणे बिनशेती सारा आकारणी करून महसूल खात्याकडे प्रस्ताव सादर करणे.
 • नगर भूमापन परिसिमेतील मिळकतींचा / नगर भूमापन परिसिमेचा सत्ता प्रकारवार क्षेत्र व आकारांचे तरीज काढणे व प्रतिवर्षी होणा-या कमी जास्त पत्रकाप्रमाणे 31 जुलै पूर्वी तेरीज काढून सादर करणे.
 • उप अधीक्षक भूमि अभिलेख यांचे निदेशाप्रमाणे कामकाज करणे.

कनिष्ठ लिपीक यांची कर्तव्ये

 • पगार, प्रवास भत्ता, अग्रिम मधून आकस्मिक खर्च व इतर सर्व प्रकारची बिले तयार करण्याचे काम व त्यासंबंधीच्या नोंदवहया तयार करणे आणि पत्रव्यवहार करणे.
 • जडसंग्रह नोंदवही संधारण करणे व पत्रव्यवहार करणे.
 • लेखन सामुग्री/ चित्रकला वस्तु / विशेष फॉर्म बाबतचे वाटप करणे व हिशोब ठेवणे.
 • वर्ग 4 चे गणवेश / कापडी / छत्रीबाबतचे मागणी पत्रक तयार करणे, वाटप करणे, नोंदवही संधारण करणे.
 • भविष्य निर्वाह निधी अर्जाप्रमाणे मंजूरीचे आदेश करून बिल तयार करणे व हिशोब ठेवणे
 • वर्ग 4 चे भविष्य निर्वाह निधीच्या नोंदवहया संधारण ठेवणे.
 • कार्यालयीन व परिरक्षण भूमापकांचे कार्यालयीन भाडे प्रस्ताव तयार करण्याचे काम .
 • लेखा परिक्षण अहवाल .
 • लेखा संबंधीचे नियतकालीक विवरण.
 • उप अधीक्षक भूमि अभिलेख यांचे निदेशाप्रमाणे कामकाज करणे.

आवक - जावक लिपीक यांची कर्तव्ये

 • कार्यालयात येणार डाक प्राप्त करून घेणे.
 • आवक - जावक नोंदवहया संधारण करणे व वाटप नोंदवही ठेवणे.
 • नियतकालीक नोंदवही संधारण करणे.
 • पोस्टाच्या तिकीटांचा हिशोबाची नोंदवही संधारण करणे.
 • रचना व कार्यपध्दती अंतर्गत नोंदवहया संधारण करणे व अद्यावत ठेवणे.
 • लेखन सामग्री/ चित्रकला वस्तु / विशेष नमुना / विहित नमुना मागणी पत्र तयार करून सादर करणे.
 • सर्व संकलनाचे कार्यविवरण पंजीचे गोषवारा रजिस्ट्रर तयार करून अद्यावत ठेवणे.
 • उप अधीक्षक भूमि अभिलेख यांचे निदेशाप्रमाणे कामकाज करणे.

प्रतिलिपी लिपीक (उतारा कारकून ) यांची कर्तव्ये

 • प्राप्त अर्जानुसार सर्व योजनावरील अभिलेखाच्या नकला तयार करणे.
 • कार्यालयीन कामासाठी अभिलेखाच्या नकाला तयार करणे.
 • नकला संबंधी सर्व नोंदवहया ठेवणे.
 • प्राप्त नकलेच्या अर्जानुसार अभिलेखावरून खात्री करून नियमानुसार नकलेच्या फी ची रक्कम अर्जावर नोंदवून मुख्यालय सहाय्यक यांचेकडे पावती देणेसाठी पाठविणे.
 • सर्व प्रकारच्या पोटहिस्स्यांचे नि.वि. तयार करणे व सादर करणे.
 • पोटहिस्सा मोजणी प्रकरणाच्या नोंदवहया तयार करणे व अद्यावत ठेवणे.
 • पोटहिस्साकामी सर्व पत्रव्यवहार.
 • उप अधीक्षक भूमि अभिलेख हे वेळोवेळी ठरवून देतील ती कामे / कर्तव्ये पार पाडणे.

दुरूस्ती लिपीक यांची कर्तव्ये

 • पुर्नमोजणी / एकत्रिकरणाबाबतचे अभिलेख दुरूस्ती संबंधी प्राप्त तक्रारी अर्जाची नोंदवही ठेवणे, प्रकरण चौकशीसाठी देणे, चौकशी अहवाल व संबंधित कागदपत्र प्राप्त करून घेणे आणि प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर करणे. तसेच त्या संबंधिचा पत्रव्यवहार.
 • दुरूस्ती आदेशाची नोंदवही ठेवणे/ प्राप्त आदेशानुसार तलाठी व कार्यलयीन अभिलेख दुरूस्त करणे. तत्संबंधी पत्रव्यवहार करणे.
 • पुर्नमोजणी / एकत्रिकरण योजनेचे सर्व प्रकारचे प्रगती विवरण तयार करून सादर करणे.
 • पुर्नमोजणीची सनद फी वसुली संबंधी नोंदवही ठेवणे. अहवाल सादर करणे, गांवाचे मागणी पत्रका संबंधी पत्रव्यवहार करणे.
 • पुर्नमोजणी / एकत्रिकरण योजनेचे अपूर्ण व सदोष कामासंबंधी पत्रव्यवहार करणे व आणि कामाची माहिती ठेवणे.
 • उप अधीक्षक भूमि अभिलेख हे वेळोवेळी ठरवून देतील ती कामे / कर्तव्ये पार पाडणे.

अभिलेखापाल यांची कर्तव्ये

 • कार्यालयीन अभिलेखागार सांभाळणे.
 • तालुक्यातील सर्व गावांच्या (विविध योजना) अभिलेखांचा कार्यभार त्यांचेवर राहील.
 • अभिलेखासंबंधी सर्व नोंदवह्या व पत्रव्यवहार व अभिलेख देवाण-घेवाणाचे काम.
 • अभिलेख वार्षिक तपासणी फाईल हाताळणे.
 • भूसंपादनव्यतिरिक्त कमी जास्त पत्रक / भूसंपादनातील कमी जास्त पत्रक आकारबंदाला शिवणे.
 • छापील नकाशाच्या हिशोबाची नोंदवही ठेवणे.
 • प्लॅस्टिकीकरण / लॅमिनेशन / बायडिंग इत्यादी कामे व पत्रव्यवहार
 • तालुका नकाश व ग्राम नकाशे छपाईसाठी पाठविणे व त्याबाबतचा पत्रव्यवहार
 • उप अधीक्षक भूमि अभिलेख हे ठरवून देतील ती कामे / कर्तव्ये पार पाडणे

सिटीएस लिपीक

 • शहर / गावठाण / नागरी भूमापन कामाचेसंबंधी सर्व प्रकारचे प्रगती विवरण तयार करुन सादर करणे.
 • नगर भूमापन कामसंबंधीचा सर्व प्रकारचा पत्रव्यवहार.
 • नगर भूमापन / गावठाण दुरुस्तीबाबत प्राप्त झालेल्या प्रकरणासाठी नोंदवहया तयार करणे, दुरुस्ती प्रकरणे नोंदवणे व संबंधीतांना दुरुस्ती प्रस्ताव सादर करणेस देणे व आदेशाप्रमाणे दुरुस्तीची कार्यवाही बाबत पत्रव्यवहार करणे.
 • उप अधीक्षक भूमि अभिलेख हे ठरवून देतील ती कामे/ कर्तव्ये पार पाडणे.

भूकरमापक : 1

 • मोजणी प्रकरणे सर्व प्रकारची (कोर्ट कमिशन / वाटप वगळून).
 • बरसात काम.
 • उप अधीक्षक भूमि अभिलेख हे ठरवून देतील ती कामे/ कर्तव्ये करणे.

भूकरमापक: 2

 • पोट हिस्सा मोजणी प्रकरणे.
 • बरसात काम (आकारफोड वगैरे)
 • चौकशी कामाच्या नोटीसा काढणे.
 • उप अधीक्षक भूमि अभिलेख हे ठरवून देतील ती कामे/ कर्तव्ये करणे.

भूकरमापक : 3

 • भूसंपादन मोजणी प्रकरणे.
 • बरसात काम (कमी-जास्त पत्रक)
 • उप अधीक्षक भूमि अभिलेख हे ठरवून देतील ती कामे/ कर्तव्ये पार पाडणे.

भूकरमापक : 4

 • पुनर्मोजणी योजनेतील मोजणी काम.
 • पुनर्मोजणी / एकत्रीकरण तक्रारी अर्ज निपटारा करणे.
 • पुनर्मोजणी बरसात काम.
 • शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे, अतिरिक्त जमिनीची मोजणी व त्या अनुषंगाने इतर कामकाज करणे.
 • उप अधीक्षक भूमि अभिलेख हे ठरवून देतील ती कामे/ कर्तव्ये पार पाडणे.

दप्तरबंद

 • अभिलेखागारातील गावची दप्तरे व्यवस्थित लावून ठेवणे.
 • फाटलेली कागदपत्रे व्यवस्थित चिकटवून ती दप्तरात ठेवणे.
 • फाटलेल्या नोंदवहया, बुके, मोजणी आलेख व्यवस्थित चिकटवून व लावून ते शिवून अभिलेखागारात ठेवणे.