महसूल प्रशासन बळकट करणे व भूमि अभिलेखांचे अध्ययावतीकरण

ब) महसूल प्रशासन बळकट करणे व भूमि अभिलेखाचे अद्ययावतीकरण करणे 50% केंद्र पुरस्कृत योजना

महाराष्ट्रात सन 1991-92 पासून महसूल प्रशासन बळकट करणे व भूमि अभिलेखाचे अद्ययावतीकरण करणे या 50% केंद्र पुरस्कृत योजनेचा प्रारंभ करण्यात आला. या योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून 50% निधी उपलब्ध झाल्यानंतर राज्य शासनाने आपल्या हिश्याचा 50%निधी उपलब्ध करुन दिला आहे.

प्रस्तूत योजनेखालील महसूल प्रशासन बळकट करणे तसेच भूमि अभिलेखांचे अद्ययावतीकरण करण्यासाठी खालील उपयोजना हाती घेण्यात आल्या आहेत.

1. भूमि अभिलेख विभागासाठी तालुका स्तरावर रेकॉर्ड रुम बांधणे -

केंद्र व राज्य शासनाने यासाठी सन 1996-97 ते 2006-07 या कालावधीत 258 युनिटसाठी रक्कम रूपये 2933.04 लाख इतका निधी उपलब्ध करुन दिलेला आहे. 258 ठिकाणचे बांधकाम पूर्ण झालेले आहे.

अ.क्र. विभाग जिल्हा तालुका मंजूर युनिट
1 पुणे पुणे राजगुरूनगर,जून्नर, मावळ, शिरूर, इंदापूर, भोर,मुळशी पौंड, दौंड, वेल्हा, बारामती 11
2 सोलापूर दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, पंढरपूर, मोहोळ, माढा करमाळा, मंगळवेढा, सांगोला, उत्त्र सोलापूर 10
3 सातारा फलटण,दहिवडी , वडूज, कोरेगाव, कराड, खंडाळा, जावळी 7
4 सांगली आटपाडी, शिराळा, कवठेमहांकाळ,जत, खानापूर 5
5 कोल्हापूर हातकणंगले, शाहूवाडी, राधानगरी, शिरोळ,आजरा 5
6 मुंबई ठाणे मोखाडा, जव्हार, वाडा, तलासरी, डहाणू, पालघर, शहापूर, वसई भिवंडी, मुरबाड, अंबरनाथ, विक्रमगड 12
7 रायगड पेण, सुधागडपाली, कर्जत, रोहा, खालापूर, पोलादपूर, माणगाव 7
8 रत्नागिरी देवरूख, चिपळूण, जांजा, राजापूर, मंडणगड, खेड, गुहागर, 7
9 मुंबई उपनगर नगर भूमापन बोरीवली, मालाड, बांद्रा , विलेपार्ले 4
10 सिंधुदूर्ग मालवण, सावंतवाडी, वैभववाडी, देवगड, कणकवली, वेंगूर्ला 6
11 नाशिक नाशिक कळवण, पेठ, सुरगाणा, दिंडोरी, इगतपूरी, सिन्नर , त्रंबकेश्वर, देवळा, बागलाण, चांदवड, निफाड, येवला, मालेगाव 14
12 धुळे साक्री, शिरपूर, सिंदखेडा, 3
13 नंदुरबार अक्कलकूवा, अक्राणी , नवापूर, नव, नवापूर, नंदुरबार, तळोदा, शहादा 6
14 जळगाव रावेर, यावल, चोपडा, पारोळा, पाचोरा भुसावळ, चाळीसगाव, एरंडोल, अंमळनेर, भडगाव, मुक्ताईनगर , जामनेर 12
15 अहमदगनर अकोले, पाथर्डी,कर्जत, श्रीगोंदा, राहूरी, जामखेड, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा, संगमनेर, पारनेर, शेवगाव 12
16 औरंगाबाद नांदेड किनवट,हादगाव,भोकर, नांदेड 4
17 हिंगोली हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनूरी, बसमत 4
18 जालना मंठा, परतूर, भोकरदन, अंबड 4
19 औरंगाबाद खुल्ताबाद, गंगापूर, कन्नड, सोयगाव, पैठण 5
20 परभणी जिंतूर, सेलू, गंगाखेड, पाथरी, मानवत 5
21 लातूर अहमदपूर, निलंगा 2
22 बीड केज, धारूर, पाटोदा, गेवराई, आष्टी 5
23 अमरावती अमरावती घाटंजी, केळापूर,गारेगाव, दिग्रस, वणी, झरीझामणी, नेर, उमरखेड, महागांव ,आर्णी, कळंब, पुसद, बाभूळगाव, राळेगाव यवतमाळ,दारव्हा 16
24 अकोला तेल्हारा, पातूर, अकोट , मर्तिजापूर, बार्शीटाकळी 5
25 बूलढाणा जळगाव जामोद, मेहेकर, देवूळगावराजा, बूलढाणा, मलकापूर, मोताळा, नांदुरा ,खामगाव शेगाव, सिंदखेडराजा , बूलढाणा , मलकापूर, मोताळा, नांदुरा 12
26 अमरावती धारणी, चिखलदरा, अचलपूर, वरूड, मोर्शी, चांदूररेल्वे, अंजनगाव, दर्यापूर, नांदगाव खांडेश्वर ,तिवसा, चांदूरबाजार 11
27 वाशिम मानोरा, मालेगाव, रिसोड, कारंजा, वाशिम, मंगरूळपीर 6
28 नागपूर नागपूर रामटेक, नरखेड, पारशिवणी, सावनेर, काटोल, उमरेड, हिंगणा, भिवापूर, कळमेश्वर कामठी, मौदा 11
29 गडचिरोली धानोरा, चार्मोशी, अहेरी ,एटापल्ली, सिरोंचा, आरमोरी, कोरची, कूरखेडा, मूलचेरा, भामरागड, वडसा, गडचिरोली, नागर्भीड व चिमूर 12
30 चंद्रपूर गोंडपिंपरी, कोरपना, राजूरा , चंद्रपूर, वरोरा, मूल, भद्रावती, सावली, सिंदेवाही, जिवती, बल्लारपूर, ब्रम्हपूरी 14
31 गोंदिया देवरी, सालेकसा, मारेगाव, अर्जुनी मोरगाव, गोदिया, सडक अर्जुनी, तिरोडा 7
32 भंडारा साकोली, तुमसर, भंडारा, मोहाडी, पवनी , लाखांदूर, 6
33 वर्धा कारंजा, समुद्रपूर, आर्वी, सेलू, हिंगणघाट, देवळी, वर्धा, आष्टी 8
एकुण 258
दुर्गम व आदिवासी क्षेत्रात तलाठयांसाठी कार्यालय तथा निवासस्थान बांधणे - यासाठी केंद्र व राज्य शासनाने सन 1996-97 ते 2006-07 पर्यन्त एकूण रक्कम रूपये 2344.69 लाख इतका निधी 1025 युनिट बांधकामासाठी उपलब्ध करुन दिलेला आहे. त्यातून आतापर्यन्त 1025 युनिटचे बांधकाम पूर्ण झालेले आहे .
अ.क्र. विभाग जिल्हा बांधकाम पूर्ण युनिट
1 पुणे पुणे 25
2 सातारा 40
3 सांगली 34
4 सोलापूर 40
5 कोल्हापूर 5
6 मुंबई ठाणे 11
7 रायगड 34
8 रत्नागिरी 43
9 सिंधूदूर्ग 32
10 नाशिक नाशिक 57
11 धुळे 51
12 नंदुरबार 35
13 जळगाव 35
14 अहमदनगर 28
15 औरंगाबाद नांदेड 40
16 हिंगोली 20
17 उस्मानाबाद 25
18 परभणी 20
19 जालना 15
20 औरंगाबाद 15
21 बीड 10
22 लातूर 10
23 अमरावती अमरावती 52
25 यवतमाळ 52
26 अकोला 5
27 वाशिम 10
28 बुलढाणा 26
29 नागपूर नागपूर 25
30 चंद्रपूर 78
31 भंडारा 15
32 गोंदिया 39
33 गडचिरोली 69
34 वर्धा 14
एकुण 1025

2. संगणकीकृत अभिलेख कक्ष तयार करणे-

भूमि अभिलेख विभागातील कार्यालयांचे संगणकीकरणाचे कामासाठी आतापर्यन्त सन 2002-03 ते 2007-08 या कालावधीत 155 युनिटकरिता केंद्र व राज्य शासनाकडून रक्कम रूपये 396.77 लाख इतका निधी उपलब्ध झालेला आहे. त्यापैकी 155 ठिकाणचे काम पूर्ण झाले आहे.

3. भूमि अभिलेख विभागासाठी अद्यावत उपकरणे व यंत्रसामुग्री खरेदी करणे-

केंद्र व राज्य शासनाने 1993-94 ते 2007-08 या वित्तीय वर्षामध्ये एकूण रुपये 2117.30 लाख निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्यातून थेडोलाइट मशीन, 131 इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन मशीन, 1 डीजीपीएस मशीन, लॅमिनेशन मशीन व रोल,प्लॅन प्रिंटर, लोखंडी कपाटे, रॅक्स, फोटो कॉपीअर, झेरॉक्स मशीन्स, ब्ल्यू प्रिंट मशीन्स, लॉ बुक्स, नकाशे ठेवण्याकरिता प्लास्टीक कंटेन्ट, प्लॉटर इत्यादी बाबी खरेदी केलेल्या आहेत.

4. भूमि अभिलेख विभाग व महसूल विभागासाठी औरंगाबाद येथे प्रशिक्षण प्रबोधिनी व आधुनिक यंत्रसामुग्री खरेदी करणे-

केंद्र व राज्य शासनाने वर्ष 1994-95 ते 2005-06 या कालावधीत एकूण रुपये 240.55 लाख इतका निधी मंजूर केलेला आहे. या प्रशिक्षण शाळेचे बांधकाम पूर्ण झालेले असून त्याचा ताबा भूमि अभिलेख विभागाने घेतलेला आहे. तसेच प्रशिक्षण शाळेसाठी आधुनिक यंत्रसामुग्री खरेदी करण्यात आली आहे. भूमि अभिलेख विभागाची सर्व प्रशिक्षण देण्याचे काम या प्रबोधिनीत करण्यात येते

5. तलाठयांना प्रशिक्षण देणे -

केंद्र व राज्य शासनाने वर्ष 1996-97 मध्ये रुपये 13.64 लाख इतका निधी उपलब्ध करुन दिलेला आहे. हा निधी प्रत्येक विभागात संबंधित विभागीय आयुक्त यांना प्रशिक्षणाच्या प्रयोजनासाठी वाटप करण्यात आला. त्यानुसार तलाठयांना प्रशिक्षण देण्यात आले.

6. महसूल तसेच भूमि अभिलेख विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाकरिता फोटो कॉपीअर्स खरेदी करणे -

केंद्र व राज्य शासनाने वर्ष 1996-97 ते 1998-99 मध्ये एकूण 530.60 लाख रुपये इतका निधी उपलब्ध करुन दिलेला आहे. यामधून महसूल व भूमि अभिलेख विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांसाठी एकूण 859 फोटो कॉपीअर खरेदी केलेले आहेत.

7. तलाठी प्रशिक्षण केंद्र उभारणे व आधुनिक यंत्रसा मुग्री खरेदी -

या योजनेसाठी केंद्र व राज्य शासनाने सन 2002-03 ते 2005-06 या कालावधीत 743.56 लाख इतका निधी उपलब्ध करुन दिलेला आहे.

विभाग मंजूर निधी लाखात प्रयोजन कामाची सद्यस्थिती
नाशिक 150.00 तलाठी प्रशिक्षण केंद्र बांधकाम पूर्ण
मुंबई 150.00 तलाठी प्रशिक्षण केंद्र बांधकाम पूर्ण
पुणे 150.00 तलाठी प्रशिक्षण केंद्र बांधकाम पूर्ण
नागपूर 91.56 तलाठी प्रशिक्षण केंद्र बांधकाम पूर्ण
औरंगाबाद 75.00 महसूल प्रशिक्षण केंद्र बांधकाम पूर्ण
अमरावती 50.00 यंत्रसामुग्री खरेदी पूर्ण
नागपूर 27.00 यंत्रसामुग्री खरेदी पूर्ण
औरंगाबाद 50.00 यंत्रसामुग्री खरेदी पूर्ण
एकूण 743.56

8. भूमि अभिलेख विभागासाठी संग्रहालय उभारणे -

योजनेसाठी केंद्र व राज्य शासनाने सन 2002-03 ते 2005-06 या कालावधीत 20.00 लाख इतका निधी उपलब्ध करुन देणेत आलेला आहे.