ई फेरफार

पथदर्शी प्रकल्प
ई फेरफार आज्ञावली

1. युनिटरी ज्युरिसडिक्शन पथदर्शी प्रकल्प. : -

ज्या वेळी एका दुय्यम निबंधकाचे कार्यक्षेत्रात एकच तहसिलदार, उप अधीक्षक भूमि अभिलेख, नगर भूमापन अधीकारी असतात किंवा एकच तहसिलदार, उप अधीक्षक भूमि अभिलेख, नगर भूमापन अधीकारी यांचे कार्यक्षेत्रात एकच दुय्यम निबंधक असतात त्यास युनिटरी ज्युरिडिक्श्न असे संबोधले जाते. ई फेरफार आज्ञावलीची युनिटरी ज्युरिडिक्श्नमध्ये तपासणी करण्याचा पथदर्शी प्रकल्प मुळशी तालुक्यात तहसिलदार मुळशी व दुय्यम निबंधक मुळशी कार्यालयात सन 2010पासून कार्यान्वीत करणेत आलेला आहे. दुय्यम निबंधक मुळशी कार्यालयात दस्ताची नोंद झाल्यानंतर त्याची सूचना तहसिलदार मुळशी कार्यालयास पाठविली जाते. दुय्यम निबंधक मुळशी व तहसिलदार मुळशी कार्यालये एकाच आवारात असल्याने दस्त्ाे नोंदणीसाठी आलेले पक्षकार तहसिलदार मुळशी कार्यालयात जावून सदर नोंदणीकृत दस्तानुसार नोंदविलेल्या फेरफाराची नोटीस प्राप्त करून घेतात. त्यानंतर सदर फेरफार नोंदीसंबधीच्या कागदपत्रे संबधीत तलाठी यांचेकडे पाठविली जातात. संबधित तलाठी व मंडल अधिकारी त्यावर नियमानुसार फेरफाराची उर्वरीत प्रक्रिया पूर्ण करतात.

2. कॉन्करंन्ट ज्युरिडिक्शन पथदर्शी प्रकल्प : -

ज्या वेळी एका दुय्यम निबंधकाचे कार्यक्षेत्रात एका पेक्षा जास्त तहसिलदार, उप अधीक्षक भूमि अभिलेख, नगर भूमापन अधीकारी असतात किंवा एका तहसिलदार , उप अधीक्षक भूमि अभिलेख, नगर भूमापन अधीकारी यांचे कार्यक्षेत्रात अनेक दुय्यम निबंधक असतात त्यास कॉन्करंन्ट ज्युरिडिक्शन असे संबोधले जाते. ई फेरफार आज्ञावलीची कॉन्करंन्ट ज्युरिडिक्शन मध्ये तपासणी करण्यासाठीचा पथदर्शी प्रकल्प पुणे जिल्हयातील हवेली व मुळशी तालुक्यातील तहसिलदार पुणे शहर, तहसिलदार हवेली, तहसिलदार मुळशी,उप अधीक्षक भूमि अभिलेख हवेली, उप अधीक्षक भूमि अभिलेख मुळशी, नगर भूमापन अधिकारी क्र.1पुणे, नगर भूमापन अधिकारी क्र.2 पुणे, सहदुय्यम निबंधक हवेली क्र. 1,10व11, दुय्यम निबंधक मुळशी , दुय्यम निबंधक हिंजवडी या कार्यालयात जानेवारी 2012 पासून कार्यान्वीत करण्यात आलेला आहे. या पथदर्शी प्रकल्पात महसुल व भूमि अभिलेख कार्यालये M PLS – VPN( Multi protocol Laballed Switching - Virtual private Network) या प्रकारच्या अत्याधुनिक स्वरूपाच्या कनेक्टीव्हीटीने दुय्यम निबंधक कार्यालयांशी जोडण्यात आलेली आहेत.

दुय्यम निबंधक यांचे कार्यालयात दस्ताची नोंदणी होताच दुय्यम निबंधक आज्ञावलीव्दारे नोंदणीकृत दस्ताची सूचना संबधीत महसुल किंवा भूमि अभिलेख कार्यालयातील म्युटेशन सेलला पाठवितात. म्युटेशन सेल मधील कर्मचारी सदर सूचनेनुसार आज्ञावलीत फेरफार नोंद घेवून नमुना नं. 9 ची नोटीस तयार करतात. त्यावर डिजिटल स्वाक्षरी करून सदरची नमुना नं. 9 ची नोटीस संबधित दुय्यम निबंधक यांचेकडे दस्त नोंदणीसाठी हजर असलेलया संबधित पक्षकारांवर बजाविण्यासाठी पाठवितात. संबधित दुय्यम निबधंक सदरची नमुना नं. 9 ची नोटीस हव्या तेवढया प्रतित प्रिंट करून घेवून दस्त्ाि नोंदणीसाठी उपस्थित पक्षकारांवर बजावतात व त्या बाबत त्याची स्थळप्रतिवर स्वाक्षरी (पोहोच) घेतात. बजाविलेल्या नोटिसांची स्थळप्रत , न बजाविलेल्या नोटिसा दुय्यम निबंधक संबधित तहसिलदार किंवा भूमि अभिलेख कार्यालयास पाठवितात. तहसिलदार ती कागदपत्रे संबधित तलाठयास पाठवितात. म्युटेशन सेलमध्ये नमुना नं. 9 ची नोटीस तयार करताच संबधित फेरफार नोंदिबाबतचा SMS संबधित तलाठयास अज्ञावलीव्दारे पाठविला जातो. तलाठी त्या SMS व्दारे हस्तलिखील फेरफार नोंदवहीत फेरफाराची नोंद घेतात. तहसिलदार कार्यालयाकडून सदर फेरफाराच्या बजाविलेल्या नोटिसा व इतर कागदपत्र प्राप्त होताच तलाठी व मंडल अधिकारी त्या फेरफार नोंदीबाबत नियमानुसार पुढील कार्यवाही करतात. अनोंदणीकृत दस्तऐवजानुसार होणा-या फेरफार नोंदीबाबत तलाठी अर्ज प्राप्त होताच SMS व्दारे मुख्य सर्व्हरशी संपर्क साधून फेरफार क्र. प्राप्त करून घेतात व नियमानुसार फेरफारची पुढील कार्यवाही करतात. कनेक्टीव्हीटीमध्ये सात्यत्य नसणे व फेरफाराची नोटिस घेण्यासाठी पक्षकार दुय्यम निबंधक कार्यालया न थांबणे या दोन प्रमुख अडचणी या पथदर्शी प्रकल्पातून निदर्शनास आलेल्या आहेत.