ई चावडी

ई - चावडी आज्ञावली

गाव पातळीवरील तलाठी दप्तराचे संगणकिकरण करण्यासाठी विकसीत केलेल्या ई - चावडी आज्ञावलीची तपासणी राज्यातील सहा महसुली विभागातील खालील गावात करण्यात आलेली आहे.

अ .नं. महसुल विभाग जिल्हा तालुका गावाचे नाव
1 पुणे पुणे मुळशी सुस, चाले
2 कोकण सिंधुदुर्ग सावंतवाडी भोम, म्युन्सिपल हदद
3 औरंगाबाद जालना परतुर सातोना
नांदेड नांदेड विष्णुपूरी,
4 नागपूर नागपूर हिंगणा टाकळी

निवडलेल्या गावातील गाव नमुने ई -चावडी आज्ञावलीमध्ये भरून त्यांच्या प्रिंटस काढून त्याची तपासणी मुळ हस्तलिखीत गाव नमुन्यांशी करून आज्ञावलीव्दारे तयार झालेले गाव नमुने मुळ हस्तलिखीत गाव नमुन्यांशी तंतोतत मेळात असल्याबाबतचे संबधित तहसिलदार यांनी प्रमाणीत केले आहे.तसेच संबधित तहसिलदार यांनी ई-चावडी आज्ञावली वापरासाठी उपयुक्त असल्याबाबतचे युझर ॲक्सेपटनस रिपोर्ट (User Acceptance Report) व्दारे प्रमाणित केले आहे. याशिवाय जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडील सूचनानुसार प्रत्येक विभागीय आयुक्त यांनी त्यांचे विभागातील, प्रत्येक जिल्हयातील एका गावाची निवड करून त्या गावातील गाव नमूने ई- चावडी आज्ञावलीत भरणा करून आज्ञावलीबाबतचे आपले अभिप्राय / सुचना जमाबंदी आयुक्त कार्यालयास सादर केले आहेत. त्यांचे सुचनानुसार आज्ञावलीमध्ये सुधारणा करण्यात येत आहे.

लॅपटॉप व डेटा कार्डचा वापर करुन ई- चावडी आज्ञावलीच्या तपासणीचा पथदर्शी ‍प्रकल्प तलाठी सूस, तालुका मुळशी, जिल्हा पुणे येथे कार्यान्वित करण्यात आला आहे. यामध्ये तलाठी स्टेट डेटा सेंटर वर ठेवण्यात आलेल्या ई- चावडी आज्ञावलीशी लॅपटॉप व डेटा कार्डद्वारे संपर्क साधतात व गाव नमुन्यांच्या संगणकीकरणाची कार्यवाही करतात.