ई चावडी

ई-चावडी (तलाठी दप्तराचे संगणकीकरण)

तलाठी यांचेकडील गाव नमूना नंबर 1 ते 21 हे गाव महसूल अभिलेखाचा कणा आहेत. हे नमुने एकमेकांशी निगडीत असून, त्यात माहिती भरणे हे क्लीष्ट स्वरुपाचे काम आहे. या पध्दतीचे संगणकीकरणसाठी “ई-चावडी ” या नावाने आज्ञावली जमाबंदी आयुक्त, पुणे यांनी राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र, पुणे यांचे मदतीने विकसीत केली आहे. या आज्ञावलीचा वापर तलाठयांना त्यांच्या लॅपटॉपद्वारे सुरक्षित कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून करता येणार आहे. तलाठयांचे लॅपटॉप डाटा कार्डद्वारे स्टेट डेटा सेंटर बरोबर सुरक्षित कनेक्टिव्हिटीने जोडले जाणार आहेत. ई फेरफार आज्ञावलीतील संगणकीकृत सातबाराचा डेटा ई चावडी आज्ञावलीत वापरला जाणार आहे. जमिन महसूल वसूलीची दैनंदिन माहिती आज्ञावलीद्वारे तयार होणार आहे. त्यामुळे तलाठयांचा या कामकाजामध्ये जाणारा वेळ कमी होणार आहे. ई चावडी आज्ञावलीच्या वापरामुळे तलाठयाच्या कामकाजात सुसुत्रता व नियमितता येवून तलाठयाचे श्रम कमी होवून इतर महसूली कामे प्रभावीपणे करण्यास वेळ मिळणार आहे. सदर आज्ञावलीचा चाचणी वापर प्रत्येक जिल्हयातील एका गावात करण्यात आला आहे.

ई चावडी या आज्ञावलीच्या वापरास महसूल व वन विभागाकडील शासन निर्णय दि. 4/1/2013 अन्वये मान्यता देण्यात आलेली आहे.

eFerfar