ई नकाशा

नकाशांचे डिजीटायजेशन

भूमि अभिलेख विभागाच्या तालुका स्तरावरील कार्यालयात विविध प्रकारचे नकाशे साठवुन ठेवले आहेत. या नकाशांच्या आधारे जमिनीच्या हददी कायम करणेचा निर्णय घेतला जातो.त्यामुळे या नकाशांचे महत्व अनन्यसाधारण आहे.हे नकाशे फार वर्षांपुर्वी तयार केले असलेने नाजुक स्थितीमध्ये आहे.सबब त्यांचे डिजीटल स्वरुपात संधारण करणे ही काळाजी गरज आहे.त्यामुळे " ई नकाशा " हा प्रकल्प हाती घेणेत आला आहे.नकाशाचे संगणकीकरण करणे यामध्ये तालुका स्तरावरील उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयातील फाळणी नकाशे,भूसंपादन नकाशे,बिनशेती नकाशे इ.चे डिजीटायजेशन करणेत येणार आहे.यामुळे जनतेला संगणकीकृत सातबाराच्या बरोबर त्या जमिनीचा संगणकीकृत नकाशा उपलब्ध होणार आहे.हे नकाशे भौगोलिक प्रणालीव्दारे (GIS) संकेत स्थळावरुन जनतेस पहाणेसाठी उपलब्ध करुन दिले जाणार आहे.त्या व्दारे नागरीकांस हे अभिलेख वेबसाईटवरुन पहाता येतील.

eNakasha