ई अभिलेख

अभिलेख कक्षाचे आधुनिकीकरण

संपुर्ण राज्यातील तहसिलदार आणि उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयाकडील महत्वाच्या भूमि अभिलेखांचे स्कॅनिंग करणे बाबत.

राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत अभिलेख कक्षाचे आधुनिकीकरण करणे या घटकाची अंमलबजावणी करावयाची आहे. अभिलेख कक्षाच्या आधुनिकीकरणामध्ये तहसिलदार आणि उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयाकडील अधिकार अभिलेखाशी निगडीत महत्वाच्या अभिलेखांचे स्कॅनिंगचे काम करण्यात येणार आहे.

भूमि अभिलेखांचे स्कॅनिंग कामाचा पथदर्शी प्रकल्प पुणे जिल्हयातील तहसिलदार, हवेली, मुळशी व उप अधीक्षक भूमि अभिलेख, हवेली, मुळशी या कार्यालयात राबविण्यात आला आहे. सदर पथदर्शी प्रकल्पाचे काम मेसर्स विद्या ऑन लाईन प्रा.लि.पुणे या संस्थे मार्फत पुर्ण करण्यात आले आहे. मेसर्स विद्या ऑन लाईन प्रा.लि.पुणे यांनी स्कॅन केलेल्या अभिलेखांचा डेटा साठविण्याकरिता आवश्यक असणारी सॉफ्टवेअर तयार केलेले आहे. या सॉफ्टवेअरचा Source Code आणि IPR हा महाराष्ट्र शासनाच्या मालकीचा असणार आहे. हे सॉफ्टवेअर गरजेनुसार बदल करुन राज्यात सर्वत्र वापरणेत येणार आहे. त्याकरिता राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र पुणे यांचे सहाय्य घेण्यात येणार आहे.

संपुर्ण राज्यातील तहसिलदार आणि उप अधीक्षक भूमि अभिलेख या कार्यालयाकडील अधिकार अभिलेखांशी निगडीत महत्वाच्या व जुन्या भूमि अभिलेखांचे स्कॅनिंग करणेत येणार आहे. याकरिता संपुर्णराज्‍यातील सर्व जिल्हयातील अभिलेखांची माहिती जमाबंदी आयुक्त, पुणे कार्यालयाने संकलित केलेली आहे. विभाग निहाय स्‍कॅनिंग करावयाचे अभिलेखांचे प्रकार खालील प्रमाणे आहेत.

पुणे विभाग

अ. क्र. तहसिलदार कार्यालयाकडील स्कॅनिंग करावयाचे अभिलेख उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयाकडील स्कॅनिंग करावयाचे अभिलेख
1 जुने 7/12 टिपण
2 जुने फेरफार नोंदवही गुणाकार बुक
3 चालू खाते उतारा (गां.न.नं 8अ) आकारफोड
4 क ड ई पत्रक क.जा.प
5 ईनाम पत्रक आकारबंद
6 जन्ममृत्यू रजिष्टर योजनापत्रक / एकत्रिकरण योजना नोंदवही/दुरुस्ती योजना/शुध्दीपत्रक
7 एकत्रिकरण जबाब धारिका
8 शेतपुस्तक
9 वसलेवार बुक
10 एकत्रिकरण गांव पी.सी
11 क्षेत्रबुक
12 ताबेपावती
13 एकत्रीकरण योजनेवेळचे 9(1)9(2) चे नकाशे

मुंबई विभाग

अ . क्र . तहसिलदार कार्यालयाकडील स्कॅनिंग करावयाचे अभिलेख उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयाकडील स्कॅनिंग करावयाचे अभिलेख
1 जुने 7/12 टिपण
2 जुने फेरफार नोंदवही गुणाकार बुक
3 चालू खाते उतारा (गां.न.नं 8अ) आकारफोड
4 क ड ई पत्रक क.जा.प
5 बोट खत आकारबंद (मूळ, दशमान, गटवार, वाडी विभाजन )
6 सुड रजिष्टर योजनापत्रक / एकत्रिकरण योजना नोंदवही/ दुरुस्ती योजना/ शुध्दीपत्रक
7 ईनाम पत्रक एकत्रिकरण जबाब धारिका
8 जन्ममृत्यू रजिष्टर शेतपुस्तक
9 वसलेवार बुक
10 कच्चा सुड
11 एकत्रिकरण गांव पी.सी
12 क्षेत्रबुक
13 ताबेपावती
14 एकत्रीकरण योजनेवेळचे 9(1)9(2) चे नकाशे

नाशिक विभाग

अ . क्र . तहसिलदार कार्यालयाकडील स्कॅनिंग करावयाचे अभिलेख उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयाकडील स्कॅनिंग करावयाचे अभिलेख
1 जुने 7/12 टिपण
2

जुने फेरफार नोंदवही

गुणाकार बुक
3 चालू खाते उतारा (गां.न.नं 8अ) आकारफोड
4 क ड ई पत्रक

क.जा.प

5

ईनाम पत्रक

आकारबंद

6 जन्ममृत्यू रजिष्टर

योजनापत्रक / एकत्रिकरण योजना नोंदवही/दुरुस्ती योजना/ शुध्दीपत्रक

7

एकत्रिकरण जबाब धारिका

8 शेतपुस्तक
9 एकत्रिकरण गांव पी.सी
10 क्लासर रजिष्टर
11 वसलेवार बुक
12 क्षेत्रबुक
13 ताबेपावती
14 एकत्रीकरण योजनेवेळचे 9(1)9(2) चे नकाशे

औरंगाबाद विभाग

अ . क्र . तहसिलदार कार्यालयाकडील स्कॅनिंग करावयाचे अभिलेख उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयाकडील स्कॅनिंग करावयाचे अभिलेख
1 जुने 7/12 टिपण
2 जुने फेरफार नोंदवही गुणाकार बुक
3 चालू खाते उतारा (गां.न.नं 8अ) आकारफोड
4 क ड पत्रक क.जा.प
5 खासरापत्रक आकारबंद
6 खासरा पाहणी पत्रक योजनापत्रक / एकत्रिकरण योजना नोंदवही/दुरुस्ती योजना
7 जमाबंदी फाईल रजिस्टर एकत्रिकरण जबाब धारिका
8 जोड तक्ता अ शेतपुस्तक
9 वसलेवार बुक/ पक्का बुक
10 एकत्रिकरण जबाब धारिका
11 शेतवार पत्रक
12 रिव्हीजन बुक (रिव्हीजन आकारबंद)
13 फोडी टिपण बुक
14 पोटहिस्सा टिपण बुक
15 क्लॉसर रजिष्टर
16 एकत्रिकरण गांव पी.सी/ ग्रामपंजी
17 क्षेत्रबुक
18 ताबेपावती
19 एकत्रीकरण योजनेवेळचे 9(1)9(2) चे नकाशे

अमरावती विभाग

अ. क्र. तहसिलदार कार्यालयाकडील स्कॅनिंग करावयाचे अभिलेख उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयाकडील स्कॅनिंग करावयाचे अभिलेख
1 जुने 7/12 टिपण
2 जुने फेरफार नोंदवही गुणाकार बुक
3 चालू खाते उतारा (गां.न.नं 8अ) आकारफोड
4 पेरे पत्रक क.जा.प
5 जमाबंदी पत्रक आकारबंद
6 जन्म मृत्यु रजिष्टरा योजनापत्रक / एकत्रिकरण योजना नोंदवही/दुरुस्ती योजना
7 एकत्रिकरण जबाब धारिका
8 शेतपुस्तक
9 पोट हिस्सा टिपण बुक
10 वसलेवार बुक/मोजणीबुक
11 एकत्रिकरण गांव पी.सी/ ग्रामपंजी
12 क्षेत्रबुक
13 पोटहिस्सा पत्रक
14 क्लासर रजिष्टर
15 वाजीब-उल-अर्ज
16 एकत्रीकरण योजनेवेळचे 9(1)9(2) चे नकाशे

नागपूर विभाग

अ . क्र . तहसिलदार कार्यालयाकडील स्कॅनिंग करावयाचे अभिलेख उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयाकडील स्कॅनिंग करावयाचे अभिलेख
1 जुने 7/12 पुनर्मोजणी आकारबंद
2 जुने फेरफार नोंदवही पुनर्मोजणी गुणाकारबुक
3 चालू खाते उतारा (गां.न.नं 8अ) आकारफोड
4 बंदोबस्त मिसल क जा प
5 वाजीब उल अर्ज एकत्रिकरण योजना पत्रक/ दुरुस्ती योजना/ श्‌ुध्दीपत्रक
6 निस्तारपत्रक एकत्रिकरण आकारबंद
7 शेत पुस्तक
8 एकत्रिकरण जबाबपंजी
9 एकत्रिकरण गांव पी.सी
10 बंदोबस्त मिसल
11 बंदोबस्त आकारबंद
12 वाजीव-उल-अर्ज
13 निस्तारपत्रक
14 पॉलीगॉन पत्रक
15 साईड पत्रक
16 ट्रॅव्हर्स पत्रक
17 ताबेपावती
18 एकत्रीकरण योजनेवेळचे 9(1)9(2) चे नकाशे

उपरोक्त प्रमाणे अभिलेखांच्या प्रकारनिहाय राज्यातील सर्व जिल्हयातील प्राप्त माहितीनुसार अंदाजे 30 कोटी अभिलेखांच्या पानाचे स्कॅनिंगचे काम करण्यात येणार आहे. याकरिता राज्यस्तरीय निविदा काढुन खाजगी संस्थेच्याव्दारे स्कॅनिंग काम पार पाडण्यात येणार आहे.