कॉर्स
प्रकल्प सारांश
कॉर्स (कंटिन्युअस ऑपरेटिंग रेफरन्स स्टेशन) हे मोजणी कामी महाराष्ट्रात लागू केलेले आधुनिक सर्वेक्षण तंत्रज्ञान आहे. यामध्ये जमीन सर्वेक्षणासाठी जीएनएसएस रोव्हर्सचा वापर करण्यात येतो. महाराष्ट्रात दरवर्षी अंदाजे 3,00,000 मोजणी प्रकरणांची मोजणी भूमि अभिलेख विभागाकडून करण्यात येते. पुर्वी विभागात परंपरागत सर्वेक्षण साधने जसे शंकु-साखळी, प्लेन टेबल आणि इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन मशीन यासारख्या पारंपारिक सर्वेक्षण उपकरणांचा वापर करून सर्वेक्षण केले जात होते परंतु त्यांचा वापरास तांत्रिक मर्यादा होत्या आणि व्यापक वापरासाठी त्यांची अचूकता कमी होती. कॉर्स तंत्रज्ञानाच्या वापरासाठी सन 2021-2022 मध्ये, सर्व्हे ऑफ इंडियाच्या माध्यमातून राज्यभर एकूण 77 कॉर्स स्टेशन स्थापित करण्यात आले जेणेकरून जीएनएसएस रोव्हर्स च्या सहाय्याने जमीन मोजणी काम अधिक जलद, अचूकपणे आणि पारदर्शक पद्धतीने केले जात आहे. कॉर्स आणि रोव्हर्स मध्ये संदर्भ स्थानकांची आणि मोबाइल जीपीएस रिसीव्हरचे एक नेटवर्क असते जे एकत्रितपणे वापरले जाते, त्यामुळे मोजणी कामाची अचूकता वाढून ती सेंटीमीटर मर्यादेपर्यंत प्राप्त होते. या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे मोजणी काम केल्यानंतर तयार होणारा नकाशा जीआयएस प्रणालीवर आधारीत असून तो अक्षांश व रेखांशासहीत तयार होत आहे. याकरिता भूमि अभिलेख विभागातील प्रत्येक भूकरमापकास जीएनएसएस रोव्हर्स पुरविण्यात येत आहेत, त्यानुसार सद्यस्थितीत विभागामध्ये एकुण 1705 जीएनएसएस रोव्हर्स उपलब्ध असून त्याद्वारे मोजणी काम करण्यात येत असून विभागामध्ये अजून नवीन जीएनएसएस रोव्हर्स शासनाकडून पुरविण्यात येत आहे. या तंत्रज्ञानाच्या अचूक वापरामुळे सरासरी मोजणी क्षमता वाढून जमिनीचे वाद कमी होण्यास आणि भूमी अभिलेख विभागाचे जमीन मोजणीचे काम अचूक, पारदर्शक आणि लोकाभिमुख होण्यास मदत झाली आहे.
चित्रे
प्रकल्प वैशिष्ट्ये
- कॉर्स जी.एन.एस.एस. रोव्हर्स व्दारे मोजणीवेळी जमीनीच्या मोजणी करावयाच्या प्रत्येक बिंदूचे अक्षांश व रेखांश प्राप्त होत असल्याने कामात पारदर्शकता व अचुकता प्राप्त होते.
- जमीन मोजणी करावयाच्या प्रत्येक बिंदुचे अक्षांश व रेखांश जीआयएस प्रणालीमध्ये अपलोड करून आज्ञावलीव्दारे त्वरीत व सोप्या पद्धतीने मोजणी नकाशे तयार करण्यात येवून तो जीआयएस प्रणाली मध्ये साठवण्यात येतो.
- या विभागामार्फत मोजणी केलेला प्रत्येक मोजणीचा नकाशा सिटीझन जीआयएस पोर्टल या प्रणालीमध्ये अपलोड करण्यात येतो.
- जमिनीच्या मोजणीवेळी जमिनीच्या प्रत्येक बिंदूचे अक्षांश व रेखांश प्राप्त होत असल्याने मूळ भूमापन नकाशांचे भूसंदर्भीकरण करणेसाठी मदत होत आहे.
- कॉर्स प्रणाली ही कोणत्याही वातावरणात जलद गतीने अचूक व पारदर्शक मोजणी काम करण्यासाठी उपयुक्त प्रणाली आहे.
प्रकल्प व्हिडिओ
प्रभाव
-
1 . वेळेची बचत
मोजणी करण्याकरीता लागणा-या कालावधीमध्ये वेळेची मोठी बचत होते.
-
2 . उद्दिष्ट साध्य
सध्या स्थितीत ५६% मोजणी प्रकरणांमध्ये मोजणी अर्ज प्राप्त झाल्यापासून ९० दिवसात मोजणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट साध्य होत आहे.
-
3 . पारदर्शकता व अचूकता
मोजणी कामात पारदर्शकता व अचूकता आल्याने मोजणी नकाशा अक्षांश व रेखांशासह पुरविण्यात येत आहे.
-
4 . ऑनलाइन नकाशा उपलब्धता
मोजणीचा नकाशा सिटीझन जीआयएस पोर्टल या प्रणालीमध्ये जनतेस ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होतो.