ईप्सित
प्रकल्प सारांश
इप्सित ही भूमी अभिलेख विभाग, महाराष्ट्र यांची एक सार्वजनिक डेटा एन्ट्री आधारित ऑनलाईन प्रणाली आहे, जी ४ एप्रिल २०२५ रोजी लोकार्पित करण्यात आली. या प्रणालीच्या माध्यमातून नागरिकांना घरबसल्या मिळकत पत्रिकेवरील फेरफारांसाठी अर्ज करता येतो, त्यामुळे त्यांना कार्यालयात प्रत्यक्ष जावे लागत नाही.२०२१ पासून विभागाने प्रॉपर्टी कार्ड वरील फेरफारासाठी पूर्णपणे ऑनलाइन आज्ञावलीचा वापर केला जात आहे आणि प्रॉपर्टी कार्डच्या मॅन्युअल नोंदी बंद केल्या आहेत.नागरिक त्यांच्या लॉगिनमधून अर्ज कोणत्या स्तरावर प्रलंबित आहे हे सहजपणे पाहू शकतात. लवकरच सर्व प्रकारचे फेरफारही या प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत.
चित्रे
प्रकल्प वैशिष्ट्ये
- पूर्णपणे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया https://epsit.mahabhumi.gov.in या संकेतस्थळावरून
- घरबसल्या अर्ज दाखल करण्याची सोय – कार्यालयात जाण्याची गरज नाही
- सध्या लागू असलेले फेरफार प्रकार: खरेदी, वारस, गहाणखत, बक्षीसपत्र, हक्कसोड
- अर्ज स्थिती ऑनलाईन ट्रॅक करण्याची सुविधा
- डॉक्युमेंट अपलोड सुविधा – डिजिटल स्वरूपात सुरक्षित संग्रह
- सोपे व नागरिकानुकूल इंटरफेस
प्रकल्प व्हिडिओ
प्रभाव
-
1 . नागरिक सशक्तीकरण
नागरिकांना आता दलालांशिवाय स्वतः फेरफार अर्ज करता येतो.
-
2 . वेळेची बचत
कागदपत्रांची देवाणघेवाण, प्रवास व रांगेत उभे राहण्याचा वेळ वाचतो.
-
3 . पैशाची बचत
प्रवास खर्च, छपाई व इतर बाबींसाठी लागणारा खर्च टळतो.
-
4 . कार्यालयीन पारदर्शकता
अर्जाची स्थिती थेट ऑनलाईन पाहता येते, ज्यामुळे नागरिकांचा विश्वास वाढतो.
-
5 . डिजिटल गव्हर्नन्सची वाटचाल
भूमी अभिलेख विभागाच्या डिजिटल परिवर्तनाचा एक महत्त्वाचा टप्पा.