भूमापन नकाशांचे डिजीटायझेशन
प्रकल्प सारांश
केंद्र शासनाच्या डिजीटल इंडिया भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमातंर्गत, राज्यातील भूमापन नकाशांचे डिजीटायझेशन करण्याच्या प्रकल्पाअंतर्गत पहिल्या टप्प्यात पुणे, रायगड, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या ६ जिल्ह्यातील भूमापन नकाशांचे काम हाती घेण्यात आले होते. सदरचे काम आता पुर्ण झालेले असून नागरीकांना जमिनीचे डिजीटल नकाशे ऑनलाईन लवकरच उपलब्ध होणार आहेत.
चित्रे
प्रकल्प वैशिष्ट्ये
- प्रचलित अभिलेख १०० वर्षापूर्वीचे असून ते कागदावर असल्याने जीर्ण व फाटके झालेले आहेत.
- कागदी व कापडी स्वरूपातील नकाशांचे डिजीटल स्वरूपात संवर्धन करणे.
- डिजीटल नकाशांचा तात्काळ शोध घेवुन जनतेस मागणी प्रमाणे नकाशे त्वरीत उपलब्ध करुन देणे.
- डिजीटल नकाशांचा कॉर्स रोव्हर्स व ई टि एस मोजणीसाठी वापर करणे.
- डिजीटल नकाशे भू-नकाशा वेबसाईटद्वारे जनतेस उपलब्ध करणे.
- संगणकीकृत ७/१२ बरोबर जोडणी करणे.
प्रकल्प व्हिडिओ
प्रभाव
- 1 . सदर अभिलेखांचे संपूर्ण संगणकीकरण झाल्यास अभिलेखांच्या नकला जनतेला सहज आणि वेळेत उपलब्ध करून देणे सोईचे होईल. तसेच ते ऑनलाईनही उपलब्ध करून देता येतील.
- 2 . भूमापन अभिलेख डिजिटल स्वरूपात उपलब्ध झाल्यास त्यांचा वापर कॉर्स रोव्हर्स व व ई टि एस मोजणीच्या वेळी मूळ अभिलेख बसविणेसाठी (superimpose) वापरता येतील.
- 3 . प्रचलित अधिकार अभिलेख (Textual data) आणि त्यासंबंधित भूमापन अभिलेख (Spatial data) हे एकमेकांशी संलग्न करून ते जनतेस एकत्रित उपलब्ध करून देण्यासाठी भूमापन नकाशे डिजिटल स्वरूपात असणे आवश्यक आहे.
- 4 . भूमापन नकाशांचे महत्व अनन्य साधारण असून पुनर्मोजणीमध्ये नकाशांचे डिजिटायझेशन केल्यानंतर प्रत्येक भूभागाचे नकाशे तयार करण्यासाठी त्यांचा वापर करता येईल.
- 5 . शासनाचे इतर विभाग यांना विकास कामासाठी / नियोजनासाठी वापर करता येईल.