ई-चावडी
प्रकल्प सारांश
राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत ई-चावडी प्रणाली अंमलात आणण्यात येत असून, या प्रकल्पाचा मुख्य उद्देश ग्राम महसूल अधिकारी दप्तरातील गाव नमुने १ ते २१ चे संपूर्ण संगणकीकरण करणे व महसूल आकारणीची माहिती नागरिकांना ऑनलाईन पोर्टलद्वारे उपलब्ध करून देणे आहे. सदर आकारणीची रक्कम नागरिकांकडून ऑनलाईन स्वीकारून ती शासनाच्या तिजोरीत भरण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येत आहे.संपूर्ण प्रक्रिया स्वयंचलित संगणकीकृत प्रणालीद्वारे पार पडणार आहे. याकरिता सुरक्षित व सुलभ पेमेंट गेटवे प्रणाली विकसित करण्यात येत आहे. या माध्यमातून नागरिक ऑनलाइन रक्कम भरू शकतील, त्वरित पावती प्राप्त करू शकतील, तसेच संबंधित रक्कम GRAS प्रणालीच्या साहाय्याने थेट शासनाच्या तिजोरीत वर्ग केली जाईल.
चित्रे
प्रकल्प वैशिष्ट्ये
- आकारणी विषयक अद्ययावतीकरण: जमीन महसूल व जमीन महसूल व्यतिरिक्त कर आकारणीचे अद्ययावतीकरण महसुलाची मागणी निश्चित करण्यात आले आहे.
- नगरपालिका व महानगरपालिकांचे अकृषक दर निश्चित करण्यात आले असून वसुली महसुलाची रक्कम मागणी निश्चित करण्यात आली आहे.
- आकारबंद विषयक अद्ययावतीकरण: ग्राम महसूल अधिकारी दप्तर व भूमिअभिलेख कार्यालयातील आकारबंद यांचा ताळमेळ घेऊन अद्ययावतीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे.
- इतर नमुने अद्ययावतीकरण: गाव नमुना क्र. १५, १६ व अन्य आवश्यक नमुन्यांचे सुधारित अद्ययावतीकरण सुरू आहे.
- महसूल किती लागला आहे हे पाहता येईल.
- घरबसल्या ऑनलाईन महसूल भरता येईल.
- ऑनलाईन पावती लगेच मिळेल.
- पुढील कामकाजासाठी महसूल सारा माफी प्रमाणपत्र मिळेल.
- मागील तीन वर्षांच्या महसूल पावत्या डाउनलोड करता येतील.
प्रकल्प व्हिडिओ
प्रभाव
-
1 . आकारणी निश्चिती:
शेतजमिनीवर लागणारा महसूल ग्राम महसूल अधिकारी यांनी प्रणालीत टाकलेला आहे.
-
2 . ऑनलाईन आकारणी पत्रक (Demand Notice)
महसूल किती लागला आहे याचे पत्रक आता ई-चावडी पोर्टलवर उपलब्ध आहे.
-
3 . पेमेंट गेटवे प्रणाली
शेतकरी UPI, कार्ड किंवा नेट बँकिंग वापरून महसूल ऑनलाइन भरू शकतात.
-
4 . महसूल थेट GRAS प्रणालीमार्फत जमा
वसूल झालेली महसुलाची रक्कम GRAS प्रणालीमार्फत थेट सरकारकडे जमा होते.
-
5 . गाव नमुन्यांचे अद्ययावतीकरण व महसूल मागणी निश्चिती
ई-चावडी प्रणालीमध्ये गाव नमुन्यांचे अद्ययावतीकरण व महसूल मागणी निश्चितीचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे.
-
6 . ई-चावडी नागरीक पोर्टल सुविधा
ई-चावडी नागरीक पोर्टल तयार करण्यात आले असून, शेतकऱ्यांना पुढील सुविधा उपलब्ध आहेत: 1) मागील तीन वर्षांच्या महसूल पावत्या डाउनलोड करण्याची सुविधा. 2) महसूल सारा माफी प्रमाणपत्र मिळविण्याची सुविधा.