भूमापन नकाशांचे भूसंदर्भीकरण (Georeferencing) करणे.
प्रकल्प सारांश
भूमापन नकाशांचे भूसंदर्भीकरण (Georeferencing) करणे म्हणजे कागदी व कापडी स्वरूपातील भूमापन नकाशांचे स्कॅनिंग व डिजीटायझेशन करुन नकाशावरील सर्व्हे नंबर / गट नंबरचे हद्दी खुणांना अक्षांश व रेखांश प्रदान करणे.
चित्रे
प्रकल्प वैशिष्ट्ये
- कागदी व कापडी स्वरूपातील भूमापन नकाशांचे स्कॅनिंग करुन नकाशावरील सर्व्हेनंबर व गटनंबरच्या हद्दीचे डिजीटायझेशन करुन भूमापन नकाशे डिजीटल स्वरुपात उपलबध करुन घेणे.
- ग्राउंड कंट्रोल पॉईंटस म्हणुन नकाशावरील सर्व्हेनंबर व गटनंबरच्या हद्दीचे बाय-जंक्शन, ट्राय-जंक्शन, पक्की बांधकामे, मंदीर शोधुन त्यांचे प्रत्यक्ष जागेवर जाऊन जी एन एस एस रोव्हर्सच्या सहाय्याने अक्षांश व रेखांश निश्चित करणे.
- सदर ग्राउंड कंट्रोल पॉईंटस च्या अक्षांश व रेखांशाच्या आधारे नकाशावरील सर्व्हेनंबर/गटनंबरचे हद्दीखुणांना अक्षांश व रेखांश प्रदान करणे.
प्रकल्प व्हिडिओ
प्रभाव
- 1 . सद्यस्थितीत भूमापन नकाशे डिजीटल स्वरूपात (DWG, SHP & PDF) स्वरूपात उपलब्ध असून ते भूसंदर्भिय नसलेने जी आय एस प्लॅटफॉर्मवर त्यांचा वापर करताना अडचणी निर्माण होत आहेत.
- 2 . भूमापन नकाशे जिओ रेफरन्स केल्यास त्याचा वापर जी आय एस प्लॅटफॉर्मवर करता येईल.
- 3 . भूमापन जिओ रेफरन्सिंग नकाशे इतर विभागास पुरविल्यास महानगरपालिका / नगररचना / महामार्ग रस्ते विकास महामंडळ इत्यादी संस्थेस नियोजनकामी त्याचा वापर होईल.
- 4 . ई मोजणी व्हर्जन 2.0 आज्ञावलीमध्ये रोव्हर्सद्वारे मोजणी केल्यांनतर जिओ रेफरन्सिंग केलेल्या भूमापन नकाशांचा वापर प्रभावीपणे करता येईल.
- 5 . भूमापन जिओ रेफरन्सिंग केल्यास जमिनीचे अक्षांश रेखांश प्रत्यक्ष जागेवर न जाता उपलब्ध होतील.
- 6 . संगणकीकृत ७/१२ बरोबर जोडणी जिओ रेफरन्सिंग संलग्न करता येतील.
- 7 . जिओ रेफरन्स केल्यास ई मोजणी व्हर्जन २.० आज्ञावलीमध्ये रोव्हर्सद्वारे मोजणी केल्यांनतर जिओ रेफरन्सिंग केलेल्या भूमापन नकाशांचा महाभुलेख पोर्टलवर युलपीएन, सर्व्हे नंबर, गट नंबर, क्षेत्रासह जमिनीचा अक्षांश रेखांश नकाशा उपलब्ध होईल.