ई-मोजणी २.०
प्रकल्प सारांश
महाराष्ट्र राज्यात भूमि अभिलेख विभागाकडून जमिनींच्या मोजणीसाठी अत्याधुनिक व पारदर्शक अशी जीआयएस आधारित ई-मोजणी व्हर्जन २.० ही आज्ञावली दिनांक ०१/१२/२०२४ पासुन संपुर्ण महाराष्ट्रात लागु करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे नागरिकांना घरी बसुन सोप्या पद्धतीने ई-मोजणी व्हर्जन २.० आज्ञावलीमध्ये लॉगीन करून ऑनलाईन पद्धतीने मोजणी अर्ज दाखल करता येतो. तसेच मोजणीचे शुल्क सुद्धा ऑनलाईन पद्धतीने भरता येणार असुन मोजणीची तारीख ही ऑटोजनरेटेड पद्धतीने ऑनलाईन प्राप्त होणार आहे. तसेच मोजणीच्या नंतर मिळणारी क प्रत मोजणी नकाशा हा डिजिटल स्वाक्षरी सहीत नागरिकांना त्यांच्या लॉगीन मध्ये प्राप्त होणार आहे. या प्रणालीद्वारे तयार झालेली क प्रत ही HRSI म्हणजे High Resolution Sattelite Image वर बघू शकतो. या नवीन प्रणाली मध्ये अर्ज करणेसाठी अर्जदाराला फक्त त्याचे स्वतःचे ओळखपत्र आवश्यक असुन गट नं./सर्व्हे नं. चा ७/१२ व सिटी सर्व्हे नं. चा उतारा आज्ञावलीत नमूद केल्यावर आपोआप उपलब्ध होतो. या नवीन प्रणाली मध्ये कॉर्स व रोव्हर्सच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जीआयएस तंत्रज्ञानाने मोजणी काम करण्यात येऊन अर्जदार यांना मोजणीनंतर त्यांच्या जागेचा अक्षांश व रेखांशासह डिजिटल स्वाक्षरीसह क प्रत नकाशा ऑनलाईन प्राप्त होत. असुन तो कितीही वेळा पोर्टलवरून डाऊनलोड करून घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच जमिन मोजणीचे प्रकरण पूर्ण करण्यास तीन महापेक्षा जास्त कालावधी लागणार नाही याबाबतचे नियोजन करणेकामी जिल्हानिहाय कार्यवाही सुरु आहे. त्यामुळे मोजणी कामात पारदर्शकता, सुलभता व गतीमानता आली आहे.
चित्रे
प्रकल्प वैशिष्ट्ये
- नागरिकांसाठी इतर अर्जदारांसाठी ऑनलाइन मोजणी अर्ज सुविधा.
- ऑनलाइन सोपी पेमेंट पद्धत.
- आर.ओ.आर. ची सर्व माहिती ऑनलाइन मिळवली जाते. मोजणी तारखेचे ऑनलाइन स्वयंचलित वेळापत्रक आणि सर्वेक्षकाला वाटप.
- जीआयएस बेस रोव्हर्स वापरून मोजमाप. वास्तविक निर्देशांक मिळवले जातात.
- ऑनलाइन मोजणी प्रक्रिया.
- वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अनिवार्य नमुना तपासणी.
- क्यूजीआयएस / आर्कजीआयएस वरील डिजिटायझ्ड नकाशांशी रोव्हर डेटाची तुलना केली जाते आणि निकाल आवृत्ती २.० वर अपलोड केला जातो.
- अपलोड केलेला डेटा स्वयंचलितपणे जीआयएस पोर्टलवर जातो.
- जीआयएस पोर्टलवरून ‘सी’ प्रत डाउनलोड करण्याची सुविधा.
- ई-मोजणी आवृत्ती २.० ऑनलाइन प्रणाली अतिशय पारदर्शक आहे आणि नागरिकांच्या तक्रारी कमी करू शकते.
प्रकल्प व्हिडिओ
प्रभाव
-
1 . ई- मोजणी र्व्हजन २.०
ई- मोजणी र्व्हजन २.० या नवीन प्रणालीमुळे अर्जदार यांना आधुनिक मोजणी यंत्रामुळे जलदरितीने मोजणी कार्यवाही करुन मिळत आहे.
-
2 . अर्जाची स्थिती
नागरिकांना आपल्या मोजणी अर्जाची स्थिती घरबसल्या पाहता येणार आहे.
-
3 . नागरिकांना/अर्जदाराला
तसेच नागरिकांना/अर्जदारांना त्यांचा मोजणीचा समन्वय मिळत आहे.