योजना व प्रकल्प
कॉर्स स्टेशन
कॉर्स स्टेशन :-
महाराष्ट्र राज्यात भूमि अभिलेख विभागातर्फे 77 ठिकाणी कॉर्स स्टेशन उभारणेत आली आहेत. सदर कॉर्स स्टेशनचा वापर जिआयएस प्रणाली आधारित मोजणीकाम करणेकरिता उपयोग होणार असून भारतीय सर्व्हेक्षण विभाग च्या साह्याने चंद्रपूर जिल्ह्यात राजुरा व मुल ह्या तालुका स्थळी कॉर्स स्टेशनची स्थापना करण्यात आली आहे. तसेच सदरचे कॉर्स स्टेशन स्थापनेपासून निरंतर सुरु आहे.
फायदे :-
- CORS Stations च्या मदतीने रोव्हर वापरुन करण्यात येणारे मोजणीकाम GIS प्रणाली वर आधारीत असल्याने मोजणी काम जलद व अचूक होणार असुन मोजणी कामात पारदर्शकता येणार आहे.
- मोजणी मध्ये अचुकता वाढल्याने विभागाबाबत जनतेमध्ये सकारात्मक वातावरण निर्मीती होण्यास मदत होणार आहे.
- मोजणी प्रकीया सुलभ होवून मोजणी करीता लागणारा कालावधी लक्षणीय रित्या कमी करता येईल व त्यामुळे मोजणी प्रकरणांची प्रलंबितता राहणार नाही.
- भूमापन प्रकीया अचूक व तात्काळ आणि पारदर्शक झाल्यास जिल्ह्यातील विकास कामांना गती मिळणार आहे.