योजना व प्रकल्प


आधुनिक मोजणी साहित्य

Image related to the scheme or project
  • मा.जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (म.रा.) पूणे यांनी भूमि अभिलेख विभागास आधुनिक करणेकामी प्रत्येक जिल्हयास आधुनिक मोजणी साहित्य रोव्हर पुरविले आहेत. तसेच जिल्हाधिकारी यांना जिल्हा नियोजन समिती मार्फत जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, कार्यालयास निधी पुरविणेच्या सुचना दिल्या आहेत.
  • सन 2021-22 या वर्षाकरीता जिल्हा नियोजन समिती मार्फत या कार्यालयास 1,50,20000/- रक्कम प्राप्त झालेली असून सदर निधीतून नागपूर जिल्हा करीता 15 रोव्हर सेट खरेदी करण्यांत आले आहे. सदर रोव्हर सेट नगर भूमापन अधिकारी व उप अधिक्षक भूमि अभिलेख कार्यालयास वाटप करण्यांत आले असून त्याव्दारे मोजणी काम करण्यांत येत आहे.
  • मा. जिल्हाधिकारी, नागपूर यांचे हस्ते रोव्हरचे वाटप व प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले असून जिल्हयातील मोजणी कर्मचा-यांना रोव्हरचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
  • रोव्हर हे आधुनिक डीजीपीएस (dgps) उपकरण असून सदरचे उपकरण CORS कॉर्स/सॅटेलाईट चे सिग्नल पकडून जमीनीवरील प्रत्येक बिंदुचे अक्षांश रेखांश (true co-ordinates) दर्शविते व त्या आधारे जलद गतीने मोजणी काम करता येते. सोबतच मोजणी मध्ये अचुकता येत आहे.