योजना व प्रकल्प
GNSS Rover & Controllers Training and ETS Training
महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वे ऑफ इंडिया यांचेमार्फत एकुण 77 CORS Station स्थापित करण्यात आलेले आहेत.या अंतर्गत वर्धा जिल्हात देवळी येथे एक व आष्टी येथे एक असे दोन CORS Station स्थापित केलेले असुन यांच्या आधारे भूमी अभिलेख विभागामध्ये जलद गतीने व अचुकतेने मोजणी करणेसाठी GNSS Rover & Controllers तसेच Electonic Total Station(E.T.S.) चा वापर करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्या अनुशंगाने जमाबंदी आयुक्त कार्यालयातर्फे GNSS Rover & Controllers तसेच E.T.S. चे स्पेसिफिकेशन निश्चित करून मा.जिल्हाधिकारी वर्धा यांना सदर साहीत्य खरेदी करणेकामी जिल्हा नियोजन समितीमधुन निधी उपलब्ध करून देणेबाबत कळविण्यात आले होते, त्यानुसार जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख वर्धा कार्यालयातर्फे एकुण 6 Rover & Controllers व 8 E.T.S. मशिन मिळणेबाबत प्रस्ताव जिल्हाधिकारी यांचेकडे सादर करणेत आला होता, व मा.जिल्हाधीकारी वर्धा यांचेकडून रक्कम रू. 1,22,24,800/- चे साहीत्य खरेदी करणेकामी प्रशासकिय मान्यता देणेत आली.
सदर मंजुर निधीमधुन e-Tender द्वारे Leica Geosystems या कंपनीचे एकुण 6 Leica GS18LTE GNSS RTK Rover व 8 TS10 3” R1000 EGL. T.S. मशिन खरेदी करण्यात आले. सदर नाविन्यपुर्ण मोजणी साहीत्याचे प्रशिक्षण देणेकामी Leica Geosystems द्वारे दोन Master Trainers पाठविण्यात आले होते, त्यानुसार वर्धा जिल्हातील आठ तालुक्यातील एकुण 35 कर्मचारी यांचे प्रशिक्षण कामी नियुक्ती करणेत येवुन त्यांना दिनांक 12,13,14 जुलै 2022 रोजी एकुण 3 दिवस सदर नाविन्यपुर्ण साहीत्य हाताळणी व मोजणी करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यानुसार सध्या वर्धा जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये नाविन्यपुर्ण मोजणी साहीत्याने अचुकपणे मोजणीचे काम केल्या जाते.