योजना व प्रकल्प


जिल्ह्यातील मोजनीकामाचा जलद गतीने निपटारा करणे कामी भूमि अभिलेख कार्यालयास लॅपटॉपचे वितरण.

Image related to the scheme or project

                        मा.श्री.निरंजन सुधांशु जमाबंदी आयूक्त आणि संचालक भूमि अभिलेख महा.राज्य, पुणे यांचे  पुढाकाराने सर्व राज्यात 614 लॅपटॉप वितरीत करण्यात आले असुन त्यापैकी नांदेड जिल्हयास  22 लॅपटॉप प्राप्त झाले.यांचे  वितरण  दि.21.10.2022 रोजी अधिनस्त उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयातील भूकरमापक व निमतानदार/परीरक्षण भूमापक यांना श्रीमती एस . पी . सेठीया , जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख नांदेड, यांचे हस्ते   करण्यात आले. सदर लॅपटॉपमुळे  मोजणी कामाचा निपटारा जलद गतीने होण्यास चालना मिळणार आहे. कार्यालयात प्राप्त मोजणी प्रकरणात मोजणी करुन हददीखुणा देणेची कार्यवाही  त्याच दिवशी करणेचे सोईचे होईल व त्याचा सर्वसामान्य जनतेस फायदा होईल.तसेच सदर लॅपटॉप प्राप्त झाल्यामुळे ड्रोनव्दारे  गावठाण भुमापन केलेल्या गावांचे पुढील कामकाज  करणे व EPCIS व्दारे नगर भुमापनकडील  ऑनलाईन फेरफार   घेणे कामी उपयोग  होणार आहे.