योजना व प्रकल्प


ई अर्धन्यायीक माहिती प्रणाली –

Image related to the scheme or project

संकेत स्थळ – https://eqjcourts.gov.in

ई अर्धन्यायीक माहिती प्रणाली  ही प्रत्येक राज्याच्या प्रत्येक विभागात कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्यात महसुल व वन विभाग, भूमि अभिलेख विभाग, सामान्य न्याय व  नोंदणी विभागात कार्यान्वीत  आहे.

कार्यपध्दती :-

  1. विधीज्ञांची नोंदणी
  2. प्रकरणाची नोंदणी ज्यात अर्जदार गैर अर्जदार यांची संपुर्ण माहिती व प्रकरणाची माहिती असते.
  3. पुर्व न्यायालयाचे संदर्भ व जमिनीच्या वादा बाबत माहिती.
  4. रोजनामा
  5. दैनिक सुनावणी बोर्ड / बोर्ड रद्द माहिती SMS व्दारे उपलब्द.
  6. प्रकरणाचा अंतरीम निर्णय SMS व्दारे उपलब्द.
  7. प्रकरणाचा अंतिम निर्णय संकेत स्थळावर उपलब्द तसेच SMS व्दारे उपलब्द.

वैशिष्ठ :-

  •  ई अर्धन्यायीक प्रणाली ही प्रत्येक राज्याच्या राज्यभाषेत व ईग्रंजी मध्ये उपलब्द आहे.
  •  ई अर्धन्यायीक प्रणाली ही Dashboard, SMS आणि ई मेल या माध्यमातुन उपलब्द आहे.
  •  ई अर्धन्ययीक प्रणाली ही अश्या प्रकारे तयार करण्यात आली आहे कि, जी सहज रीत्या मोबाईल,लॅपटॉप,टॅब व  संगणकावर सहज             रित्या हाताळता येते.
  • ई अर्धन्यायीक स्वरुपाच्या प्रणाली मध्ये खालील संकेतस्थळावरुन प्रकरणांची माहिती उपलब्द करुन घेता येते.
  • https://mahabhulekh.maharashtra.gov.in
  • https://igr.maharashtra.gov.in and District Websites.