योजना व प्रकल्प
धर्माबाद नगर परीषदेचे ड्रोनव्दाiरे सर्व्हेक्षण
महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषद अंतर्गत क्षेत्रातील मिळकतीचे ड्रोन द्वारे नगर भुमापन करणे चे काम मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भुमी अभिलेख (महा.राज्य) पुणे यांनी माहे जुन 2022 पासुन नियोजित केले आहे. त्या अनुषंगाने प्रायोगिक तत्वावर नांदेड जिल्हयातील दोन नगरपरिषद निवडण्यात आले आहे. मुदखेड नगर परिषद व धर्माबाद नगर परिषद. मुदखेड नगर परिषद ही मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भुमी अभिलेख (महा.राज्य) पुणे यांचे स्तरावरुन RFQ द्वारे खाजगी संस्था निवडण्यात आली आहे.
धर्माबाद नगर परिषद अंतर्गत क्षेत्र मौजे रत्नाळी व बाळापुरचे भारतीय सर्व्हेक्षण विभाग पुणे यांचे कडुन ड्रोन सर्व्हेक्षण करण्याचे नियोजण्यात आले त्या अनुषंगाने भारतीय सर्व्हेक्षण विभागाचे अधिकारी / कर्मचारी यांनी दिनांक 15.06.2022 रोजी धर्माबाद नगरपरिषद येथे ड्रोन फलॉय चा शुभारंभ करण्यात आला त्यावेळी मा. आमदार श्री. राजेश पवार, श्रीमती. एस.पी.सेठीया, जि.अ.भु.अ.नांदेड, तहसिलदार धर्माबाद, उप अधिक्षक भुमी अभिलेख धर्माबाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, नगरपरिषद धर्माबाद हे उपस्थित होते. या वेळी श्रीमती. एस.पी.सेठीया, जि.अ.भु.अ.नांदेड यांनी ड्रोन द्वारे मिळकतीचे सर्व्हेक्षणाची सविस्तर माहिती दिली.