योजना व प्रकल्प


आरे राखीव वने घोषीत जमीनीची संयुक्त मोजणी

Image related to the scheme or project

        महाराष्ट्र शासन असाधारण भाग - 4 महसूल व वनविभाग यांचेकडील दिनांक 12/10/2020 रोजीच्या अधिसुचनेनुसार बोरीवली तालुक्यातील मौजे - आरे, गोरेगांव, मरोळ-मरोशी  येथील एकूण 327.20.1 हेक्टर क्षेत्र भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 4 नुसार राखीव वन म्हणून अधिसुचीत करणेत आले. 

      सदर जागेची संयुक्त मोजणी करुन त्याच्या हददीच्या खुणा दाखविणेकामी नगर भूमापन आरे, गोरेगांव या गावाची नगर भूमापन अधिकारी, मालाड व नगर भूमापन मरोळ - मरोशी या गावाची नगर भूमापन अधिकारी, विलेपार्ले कार्यालयाकडून दिनांक 23/08/2021 ते दिनांक 6/10/2021 या कालावधीमध्ये विभागीय वन अधिकारी, संजय गांधी राष्ट्रीय उदयान व आरे दुग्ध वसाहत यांचे प्रतिनिधी यांचे उपस्थितीत संयुक्त मोजणीची तसेच हद्दीच्या खुणा दाखविण्याची कार्यवाही पूर्ण करणेत आलेली आहे.