योजना व प्रकल्प


एकात्मिक मोजणी कार्यपदधती

Image related to the scheme or project

एकात्मिक मोजणी कार्यपदधती-

माहे ऑगस्ट 2021 अखेर एकूण 11989 मोजणी प्रकरणे सातारा जिल्हयामध्ये शिल्लक असून त्यापैकी 5667 मोजणी प्रकरणे एक वर्षावरील मुदत बाहय मोजणी प्रकरणे होती. एक वर्षावरील मुदतबाहय मोजणी प्रकरणांचा निपटारा जलद गतीने करणेकामी विशेष मोहिम राबवुन त्या अंतर्गत मोजणी प्रकरणांचा निपटारा करणेकामी पुढील प्रमाणे नियोजन करणेत आले.

  1. कमी मोजणी प्रकरणे प्रलंबित असलेल्या तसेच अतिपर्जन्यमान असलेल्या तालुक्यातील कर्मचारी व ई.टी.एस. मशीन / रोव्हर, कमी पर्जन्यमान व जास्त प्रलंबित मोजणी प्रकरणे असलेल्या तालुक्यामध्ये प्रतिनियुक्तीने वर्ग करून एक वर्षावरील मोजणी प्रकरणे निकाली करणेचे नियोजन ‍करणेत आले.
  2. सातारा जिल्हयातील सर्व कार्यालयांना नियतक्रम सोडून गावनिहाय /ग्रुपनिहाय नियोजन बदल करून मोजणी प्रकरणे निकाली करणेबाबत परवानगी देवून प्राधान्यक्रमाने एक वर्षावरील मोजणी प्रकरणे निकाली करणेबाबत ‍निर्देश देण्यात आले.
  3. याप्रमाणे विशेष मोहीमेचे नियोजन करून मोजणी प्रकरणांची निकाली संख्येत वाढ झाली.