योजना व प्रकल्प
राष्ट्रीय हरीत लवाद
राष्ट्रीय हरीत लवाद : वनसदृश्य मोजणीकामाची पडताळणी
मा. राष्ट्रीय हरीत लवाद न्यायालय यांचेकडील दावा क्र.108/18 ( C.O.A. No.66/2016 ) मधील दि.27/10/2020 चे आदेशान्वये महाबळेश्वर तालुक्यामध्ये एकुण 58 गावांचे वनसदृश्य मोजणीकामाची पडताळणी करावयाची होती. त्यापैकी वनसदृश्य निरंक असलेल्या व वन विभागाचे मालकी असलेल्या जमीनी वगळून 51 गावांतील 541 सर्व्हे नंबरची मोजणी केली आणि त्यामधून साधारण 4500 हेक्टर क्षेत्राची प्रत्यक्ष DGPS प्रणाली मोजणी केली व त्यावर अभिलेख बसवून नकाशे तयार केले. सदर नकाशामुळे महाबळेश्वर पाचगणी परिसरातील पर्यावरणाचा -हास होणे टळले. भूमि अभिलेख विभागाने तयार केलेल्या नकाशामुळे आज जैव विविधता ( Bioiversity ) अद्याप टिकूण असून पर्यावरणातील समतोल आज महाबळेश्वर मध्ये या नकाशांमुळेच राहिलेला आहे.