योजना व प्रकल्प
कॉर्स
प्रकल्पाविषयी
CORS (Continuously Operating Reference Station) ही भूमापनाची प्रगत प्रणाली आहे. भारतीय सर्वेक्षण संस्था (Survey of India)यांनी संपूर्ण देशामध्ये कॉर्स नेटवर्क स्थापन करण्यास सुरुवात केलेली असून त्यापैकी 77 CORS स्थानके राज्यात स्थापन झाली आहेत. तसेच विभागात GNSS रोव्हर्स खरेदी केले जात असून त्यांच्या मदतीने रिअल टाइम डेटा प्राप्त करून घेऊन जमिनीची मोजणी केली जाईल.
दृष्टी / ध्येय
कॉर्स नेटवर्क वापरून विविध प्रकारची मोजणी करणे आणि अधिक अचूकतेसह नकाशे तयार करणे.
फायदे
Continuously Operating Reference Station ही एक प्रगत पायाभूत सुविधा आहे जी अचूकता आणि रिअल टाइम डेटा संपादनाची समस्या सोडवू शकते. मोजणीच्या कामासाठी GPS रोव्हरचा वापर केला जाणार असून ज्याद्वारे आपणास 30 सेकंदात अचूक अक्षांश – रेखांश मिळणार असून भूकरमापक नकाशा टॅबलेट पीसीवर तयारकरू शकतात.