योजना व प्रकल्प
Mapping in Mumbai suburban district
पायलट प्रोजेक्ट करीता नगर भूमापन अधिकारी चेंबुर यांचे कार्यक्षेत्रातील नगर भूमापन वाढवली व नगर भूमापन अधिकारी मालाड यांचे कार्यक्षेत्रातील नगर भूमापन दिंडोशी ही दोन गांवे सर्वेक्षणाकरीता निश्चित करण्यात आली. सदर कामाकरीता मे. इनर कॉम सोल्युशन प्रालि. व मे. रॅमटेक सॉफ्टवेअर सोल्युशन प्रा.लि. यांची निवड करण्यात आली.
नगर भूमापन दिंडोशी गावाचे डिजीपीएस तसेच ड्रोन सर्वेचे काम पुर्ण झाले आहे. त्याबाबतचा डाटा मे. इनर कॉम सोल्युशन यांनी मे. रामटेक सॉफ्टवेअर सोल्युशन यांना सादर केला आहे, त्यांचेकडून मोझॅक चे काम पूर्ण करण्यात आले आहे. मे. इनर कॉम सोल्युशन यांनी ड्रोन व्दारे सवेक्षण केलेल्या बेसमॅपचे मे. रॅमटेक सॉफ्टवेअर सोल्युशन यांनी मा.जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख, (म.राज्य) पुणे यांचे समोर सादरीकरण केले आहे.