योजना व प्रकल्प
स्वामीत्व योजना
स्वामीत्व योजना
महाराष्ट्र शासनाने गावठाण (आबादी) अंतर्गत मिळकतींचे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अद्ययावत जी.आय.एस. आधारित मालमत्ता कर नेांदवही तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गावठाण (आबादी) अंतर्गत येणाऱ्या मिळकतींचे GIS आधारित नकाशे तयार करून गावठाणातील मिळकतींचे मालमत्ता पत्रक व सनद तयार करण्यात येत आहे.
नगर भूमापन करण्यासाठी सध्याची पद्धत वापरण्यास लागणारा वेळ लक्षात घेऊन, जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य) यांनी या विषयावर भारताचे सर्वेअर जनरल, डेहराडून यांचे संयुक्त विद्यमानाने ड्रोन च्या सहाय्याने गावठाणाचे मोजणीबाबत घेतलेल्या निर्णयानुसार अकोला जिल्हयातील 837 गावांचे मोजणी काम पुर्ण केले आहेत.
दृष्टी / ध्येय
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अद्ययावत GIS आधारित नकाशे, मालमत्ता पत्रक, सनद तयार करणे व त्या व्दारे गावातील सर्व सामान्य जनता त्यांचा मिळकतींचा मालकी हक्काचा अभिलेख तयार करणे व त्याआधारे त्यांची पत सुधारणे.
फायदे
- गावांचे भूमापन आणि गावठाण क्षेत्रांमध्ये सुधारित तंत्रज्ञानासह नकाशा तयार झाल्याने मिळकत धारकांमधील वाद कमी होईल.
- नागरिेकांना त्यांच्या मिळकतीचा अचूक नकाशा, मिळकत पत्रिका व सनद मिळाल्याने त्यांची आर्थीक पत सुधारणार आहे. त्यामुळे त्यांना बॅक / पतसंस्था यांच्याकडून कर्ज सुविधा उपलब्ध होत असल्याने नागरीकांचे जिवन मान उंचावून बाजारात तरलता येईल.
- गावातील विवीध विकास कामांच्या योजनांकरीता अचूक नकाशा उपलब्ध होणार आहे.
- ग्रामपंचायत यांच्या कडील कर आकारणी नोंदवही अचूक होईल. व त्याव्दारे शासनाच्या महसूलात वाढ होईल.