महाराष्ट्र शासन महसुल व वन विभाग निर्णय क्रमांक सीटीएस 3810/ प्र.क्र.76/प्र.क्र.76/ल-1 दि. 14/07/2010 रोजीचे शासन निर्णयान्वये विस्तारीत क्षेत्राचे नगरभूमापन मोजणीचे कामास मान्यता देणेत आली आहे.
त्यानूसार सदर गावी सन 2021 पासुन सविस्तर मोजणीचे काम सुरु करुन एकूण 113 आलेखात एकूण 3929 मिळकतींचे काम पुर्ण करणेत आले आहे.
सदर मिळकतीचे चौकशीकाम पुर्ण करणेत आले आहे.
मा. उपसंचालक भूमि अभिलेख पुणे प्रदेश पुणे यांचेकडील दि. 29/07/2022 चे अधिसूचनेनूसार सदर मिळकती परिरक्षणास घेणेस परवानगी मिळाली आहे.