योजना व प्रकल्प


महास्वामित्व योजना

Image related to the scheme or project

                   सदर योजने अंतर्गत   महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग, भूमि अभिलेख विभाग व भारतीय सर्वेक्षण विभाग डेहराडून यांच्या संयुक्त सहभागाने महाराष्ट्रातील गावठाण भूमापन न झालेल्या गावांचे ड्रोनव्दारे गावठाण भूमापनाचे यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने 22 फेब्रुवारी 2019 रोजी शासन निर्णय पारीत केला असून या अनुषंगाने GIS आधारे गावांच्या गावठाणातील मिळकतींचे सर्व्हेक्षण पूर्ण करण्यात येणार आहे व संगणीकृत नकाशे,सनद व मिळकत पत्रिका तयार होणार आहेत.

               सदर गावठाण भुमापनामुळे जिल्हयातील गावठाणातील घरांचे नकाशा व सिमा निश्चित होतील. मिळकतीचे नेमके क्षेत्र किती आहे त्याची नोंद होईल, ग्रामस्थांचे नागरी हक्काचे संवर्धन होईल, गावातील रस्ते, शासनाच्या, ग्रामपंचायतीच्या खुल्या जागा, नाले यांच्या सिमा निश्चित होवून अतिक्रमण रोकता येईल. मिळकत पत्रिका तयार झाल्यामुळे मिळकत धारकांना घरावर कर्ज घेणेची सुविधा उपलब्ध होईल, ग्रामपंचायतींना गावातील कर आकारणी, बांधकाम परवानगी यासाठी अभिलेख व नकाशा उपलब्ध होतील.

                  नांदेड जिल्हयात 16 तालुक्यात   महास्वामित्व योजने अंर्तगत जुने गावठाण असलेले एकुण 1428 गावे असुन  त्यापैकी    878 गावांचे ड्रोनव्दारे गावठाण भूमापनाचे काम पुर्ण झाले आहे.तसेच 34 गावांचे सनद पुर्ण झाले आहे. 13822 मिळकतीचे मिळकत पत्रिका तयार झाले आहेत.