योजना व प्रकल्प


सीएडी कॅम्प पुलगाव येथे मोजमाप

Image related to the scheme or project

मा. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या दिनांक 16/092022 रोजीच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये मा. खासदार वर्धा लोकसभा क्षेत्र श्री रामदासजी तडस, जिल्हाधिकारी वर्धा व केंद्रीय दारूगोळा शाखा पुलगाव यांनी देवळी तालुक्यातील त्यांचे केंद्रीय दारूगोळा स्थानाचे सध्याचे संरक्षण भिंतीपासुन बाहेरील2000 यार्ड जागेची मोजणी करून देणेबाबत जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख वर्धा यांना विनंती केली होती. सदर डेपो हा 26 चौरस कि मी मध्ये व्यापलेला आहे व त्यांचा सध्याच्या संरक्षण भिंतीचे क्षेत्रफळ अंदाजे 2629.59  हेक्टर आहे, याच्या प्रत्येक Point पासुन 2000 यार्ड समांतर अशी प्रतिबंधीत सिमांकन रेषा ही केंद्र शासनाच्या अधिसुचने नुसार आखुन देण्यात यावी अशी विनंती CAD Pulgaon च्या एडमीन कमांडर यांनी केली होती. यामध्ये ब-याच टेकड्या, झाडे, नाले,झुडपी, शेती इत्यादी असल्याने सदर एवढ्या मोठ्या क्षेत्राचे मोजणी काम करणे हे सध्याच्या घडीला कठीण काम होते. परंतु सदर काम करायचेच असे ठरवुन मा.जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख वर्धा श्री प्रमोद ठुबे व मा. उप अधिक्षक भूमी अभिलेख वर्धा श्री प्रसंन्ना भूजाडे यांचे मार्गदर्शनात अत्याधुनिक Rover तंत्रज्ञानानाने मोजणी काम करणेत पारंगत असलेल्या सात भूकरमापकांची एक चमु तयार करून सदर कामास सुरूवात करण्यात आली. विवध प्रकारच्या अडचणींना समोरे जात चमुने संरक्षण भिंतीचे क्षेत्र-2629.59 हेक्टर Rover चे सहाय्याने 3 दिवसात मोजुन काढले व Data Processing करून तयार झालेल्या Irregular Figure चे Centre Point ची परीगणना केली. या क्षेत्रामध्ये अंतर्भुत होत असलेल्या एकुण 19 गावांचे डीजीटाइज्ड गावनकाशे मोजणी केलेल्या Site data वर Align करून प्रत्येक गावांमध्ये येणारे Extended Points सर्वे नंबर मध्ये Identify करून  प्रस्तावित 2000 यार्ड जागेचे सिमांकन Rover Machine द्वारे Stake out Command वापरून यशस्विरीत्या करून दिले. यामध्ये त्यांनी एकुण 6877.53 हेक्टर जमिनीची मोजणी करून एक विक्रम स्थापित केला आहे.

            सदर मोजणी स्थळावर मा. जिल्हाधीकारी वर्धा यांनी प्रत्यक्ष भेट देवुन पाहणी केली व मोजणी कामाबाबत समाधान व्यक्त केले.