योजना व प्रकल्प
महास्वामित्व
महास्वामित्व :
- महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभागाकडील शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण २०१८ प्र.क्र.१३/मातंक दिनांक : २२ फेब्रुवारी, २०१९ नुसार राज्यातील सर्व गावांच्या गावठाणांमधील जमिनींचे GIS आधारित सर्वेक्षण व भूमापन करणेबाबतची योजना, योजनांतर्गत योजना म्हणून राबविण्यास शासनाने मंजूरी दिली आहे.
- त्यानुसार या प्रकल्पांतर्गत गावठाण भूमापन न झालेल्या सर्व गावांच्या (महानगरपालिका, नगरपालिका व नगरपरिषद क्षेत्र वगळता) गावठाण क्षेत्रातील सर्व मिळकतीची मोजणी करुन
मोजणीचा नकाशा व त्याचे अचूक क्षेत्र निर्धारीत करणे, मिळकतीची सनद तयार करून संबंधित धारकांना सनदचे वितरण करणे तसेच गावातील मालमत्तांचे GIS प्रणालीवर आधारित मालमत्ता पत्रक तयार करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. - त्याकरिता SURVEY OF INDIA मार्फत ड्रोनद्वारे गावठाणातील मिळकतींचे सर्वेक्षण करून प्राप्त होणाऱ्या प्रतिमांचे भूसंदर्भीकरण (Geo-referencing) व अर्थोरेक्टीफिकेशन करण्यात येईल तसेच गावठाणातील मिळकतींचा डिजीटाईज्ड नकाशा तयार करण्यात येईल.
- सदर नकाशामधील मिळकतीना(GIS data) ग्रामपंचायतींचे मिळकत रजिस्टर जोडण्यात येईल.
- गावठाण हद्दीतीलच मिळकतींची नियमाप्रमाणे मालकी हक्काची चौकशी करून मिळकत पत्रिका व सनदा भूमि अभिलेख विभागामार्फत तयार करण्यात येऊन जनतेस सनदा सशुल्क देण्यात येतील.
- महाराष्ट्र शासनाच्या ड्रोनव्दारे गावठाण भूमापन योजनेवर आधारीत देशपातळीवर स्वामित्व योजना सुरु करण्यात आली आहे.