योजना व प्रकल्प


स्वामित्व योजनेंतर्गत सनद वाटप

Image related to the scheme or project

                  महाराष्ट्र राज्यातील सर्व गावांच्या गावठानामधील जमिनींचे GIS आधारित सर्वेक्षण व भूमापन करणे बाबतचा गावठाण जमाबंदी प्रकल्प ग्रामविकास विभाग ,जमाबंदी आयुक्त महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय भारतीय सेवेक्षण विभाग डेहराडून यांच्या संयुक्त सहभागाने राबविण्यात येत आहे अमरावती   जिल्यातील एकूण गावठाण जमाबंदी प्रकल्प योजनेत भारतीय सेवेक्षण विभाग सर्वे ऑफ इंडिया मार्फत ड्रोन द्वारे गावठाणातील मिळकतीचे सर्वेक्षण  करून   १३११  गावाचे गावठाण भूमापन करनेवर शिल्लक होते  त्यापैकी माहे ऑक्टोबर २०२२ अखेर ९१२ गावांचे ड्रोन फ्लाय पूर्ण झाले असून ४३७ गावांचे चौकशी काम पूर्ण झाले आहे.

              तसेच स्वामित्व योजनेंतर्गत तिवसा तालुक्यातील सर्व गावाचे चौकशी काम पुर्ण झाले असुन 11 गावातील मिळकत धारकाना सनद वाटप करणेत आलेली आहे.