योजना व प्रकल्प
राष्ट्रीय भुमापन दिन (10 एप्रिल 2022)
जिल्हा अधीक्षक भुमि अभिलेख नांदेड कार्यालयातर्फे दि.10 एप्रिल 2022 रोजी कै.डॉ.शंकरराव चव्हाण नियोजन भवन नांदेड येथे “ राष्ट्रीय भुमापन दिन ” चा कार्यक्रम घेण्यात आला.सदर कार्यक्रमास नांदेड जिल्हयातील उप अधीक्षक भूमि अभिलेख व सर्व भूमि अभिलेख विभागातील कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमास मा.जिल्हाधिकारी डॉ.श्री.विपीन इटनकर यांची प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थिती होती. यावेळी त्यांनी भूमि अभिलेख विभागामार्फत केल्या जाणा-या मोजणी कामासाठी आवश्यक आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करुन देणेची ग्वाही दिली तसेच लोकाभिमुख प्रशासनासाठी व मोजणी प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे असे सांगितले. कर्मचारी यांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणेची गरज असल्याचेही सांगितले. श्रीमती एस.पी सेठीया जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख नांदेड, उपस्थित होते. यावेळी भूमि अभिलेख विभागाचा इतिहास व भविष्यकालीन वाटचाल याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच भूमि अभिलेख विभागाचे कामकाज दर्शविणा-या चलचित्र फितीचे सादरीकरणही करण्यात आले. तसेच श्री बापु दासरी,समाज कल्याण अधिकारी नांदेड , यांनी कर्मचारी यांच्याशी संवाद साधुन कर्मचारी यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी श्री.रमेश गीरी, हास्यकलाकार हे उपस्थित होते. भूमापन दिनाचे औचित्य साधुन सर्व भूमि अभिलेख विभागोच कर्मचारी यांचेसाठी वैदयकीय तपासणी शिबीर किशनलालजी बहुउददेशिय सामाजिक संस्था व रेणुकाई हॉस्पीटल यांच्या संयुक्त विदयमानाने ठेवण्यात आले होते. जिल्हयातील जवळपास दीडशे कर्मचारी यांनी त्याचा लाभ घेतला. यावेळी किनवट येथिल बालकलाकार यांनी ढेमसा नृत्याचे विलोभनीय व आकर्षक नृत्य सादर केले.