योजना व प्रकल्प
ई.पी.सी.आय.एस.
ई.पी.सी.आय.एस. आज्ञावली
e-PCIS ही वेब-आधारित सेवा असून ती मालमत्ता पत्रक (शहरी अधिकार अभिलेख) यांच्या संगणकीकरण आणि डिजिटायझेशनसाठी विकसित करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये ऑनलाइन फेरफाराद्वारे मालमत्ता पत्रक अद्ययावत करता येतात.भंडारा जिल्हयामधे दिनांक 01/04/2021 पासुन प्रभावीपणे राबवीण्यात येत असुन दिनांक 31/10/2022 पावेतो जिल्हयामधे 2015 नोंदी मंजुर करण्यात आलेल्या आहेत .व ऑटो ट्रीगर म्युटेशन द्वारे 322 नोंदी मंजुर करण्यात आलेल्या आहेत .
e-PCIS प्रकल्पाचा उद्देश –
1.डिजिटल स्वाक्षरी झालेले मालमत्ता पत्रक सर्वत्र आणि सहजपणे उपलब्ध करणे.
2.डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून पारदर्शकता, सुलभता आणणे आणि फेरफार प्रकरणांचा जलद निपटारा सुनिश्चित करणे.
3.फेरफार प्रकरणांचे प्रभावी नियंत्रण, प्रमाणित प्रतींचा पुरवठा करणे आणि त्याबाबतची जबाबदारी ठरविणे.