योजना व प्रकल्प
पुणे-मिरज रेल्वेमार्ग
रेल्वे
भारताच्या दक्षिणेकडील राज्यांना जोडणारा पुणे-मिरज रेल्वेमार्ग हा सातारा जिल्हयातील फलटण,खंडाळा,सातारा,कोरेगांव व कराड या 5 तालुक्यातून जातो. सन 1888 ते 1969 पर्यंत मीटर गेज असणारा हा रेल्वेमार्ग सन 1969 साली ब्रॉड गेज झाला तर 2017 साली पुणे-मिरज या रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण व दुहेरीकरण करणेसाठी कोरेगांव तालुक्यातील एकूण 23 गावांचे भूसंपादन प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यानुसार प्रथम ई.टी.एस. मशिनच्या सहाय्याने प्राप्त भुसंपादन प्रस्तावानुसार 2018 मध्ये मोजणीकाम केले गेले सदर प्रस्तावात सखोल माहिती नमूद नसलेने प्रत्येक धारकाचे बाधीत क्षेत्र नमुद करणेचे आदेश प्राप्त झालेने पुन्हा 22 गावांतील भूसंपादन मोजणी प्रक्रीया रोव्हर सहाय्याने पूर्ण केली. अनेक वर्ष प्रलंबीत राहिलेल रेल्वे भूसंपादनाचे काम विक्रमी वेळेत पूर्ण करुन दळण वळणाच्या एका महत्वाच्या घटकास शिघ्रता आणली.