योजना व प्रकल्प
खदान मोजणी काम -
अकोला जिल्हयाचे जिल्हाधिकारी मा. श्रीमती निमा अरोरा (भा.प्र.से) यांनी खदान मोजणी कामाची स्वत: भेट देऊन प्रत्यक्ष मोजणी काम व खदान मोजणीची कार्यपध्दती समजावून घेतली.
खदान मोजणी काम -
जिल्हाधिकारी कार्यालयातील खणीकर्म विभागाकडून खाणींचे उत्खन्न करणेकामी परवानगी दिली जाते. परंतु संबंधीत खाण धारक यांचेकडून उत्खन्नास दिलेल्या परवानगी प्रमाणे उत्खनन केले आहेकिंवा नाही याची मोजमाप करता येत नव्हते
उद्दीष्ट :-
जिल्हाधिकारी यांचे मार्फत जिल्हयातील सर्व तालुक्यात जिल्हाधिकारी यांचे अधिनस्त खणीकर्म विभागाकडून खाणींचे उत्खन्न करणेकामी दिलेल्या परवानगी प्रमाणे उत्खनन केले जाते याची तपासणी करणे व तसा अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करणे.
फायदे :-
खणीकर्म विभागाकडून दिलेल्या परवानगी प्रमाणे किती उत्खनन झाले याची सविस्तर माहीती उपलब्ध होते. त्याप्रमाणे परवानगी पेक्षा उत्खनन झाले असल्यास त्याप्रमाणे संबंधीत परवाना धारकांकडून योग्य ती रॉयल्टी वसूल करण्यास मदत होते. त्यामुळे बेकायदा उत्खननास आळा बसला आहे.