योजना व प्रकल्प
ई - मोजणी
उपसंचालक भूमि अभिलेख यांचे अधिनस्त प्रत्येक जिल्हयाचे ठिकाणी जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख यांची कार्यालये आहेत. जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख यांचे अधिनस्त प्रत्येक तालुक्यास उप अधीक्षक भूमि अभिलेख यांची कार्यालये आहेत. शिवाय नगर भूमापनाचे कामासाठी राज्यात एकुण 29 कार्यालये कार्यरत आहेत. या अज्ञावलीमधुन मोजणी साठी प्राप्त झालेल्या अर्जांचे क्रमानुसार मोजणीची प्रकरणे भुकरमापकास मोजणीसाठी दिली जातात. ई मोजणी आज्ञावलीचा वापर दि.01 जानेवारी 2012 पासून मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक (म.राज्य) पुणे यांचे निर्देशाप्रमाणे संपुर्ण महाराष्ट्रात सुरू झाला असून नांदेड जिल्हयात त्याची यशस्वीपणे अमंलबजावणी चालू आहे. सदर आज्ञावलीचा वापर करून जिल्हयातील अधिनस्त 16 तालुक्यातील कार्यालयात मोजणीसाठी प्राप्त होणारे सर्व प्रकारचे मोजणी प्रकरणे ही सदर आज्ञावलीवरून ऑन लाईन स्विकारली जातात, त्यामुळे मोजणी प्रकरणे स्विकारणे व त्यासंबधीची कार्यवाहीबाबत सु-सुत्रता व पारदर्शकता आली आहे. कार्यालयातील आवश्यक असणा-या नोंदवहया हया अज्ञावलीव्दारे अद्यावत होत आहेत. सदर कार्यालयांना मोजणी प्रकरणाचे नियोजन करणे सहज व सुलभ झाले आहे. ई मोजणी आज्ञावलीमुळे वरिष्ठ कार्यालयांना मोजणी प्रकरणाचा प्रभावी आढावा घेणे सहज शक्य झाले आहे. ई मोजणी आज्ञावलीमध्ये नागरीकांसाठी त्यांना त्यांचे अर्ज भरणे, मोजणी प्रकारानुसार फीस बाबतची माहिती करुन घेणे तसेच मोजणी अर्जाची सध्यास्थिती जाणुन घेणे बाबतची सुविधा देण्यात आलेली आहे.