योजना व प्रकल्प


गावठाण जमाबंदी प्रकल्प स्वामीत्व योजना

Image related to the scheme or project

राज्यातील सर्व गावांच्या गावठाणामधील जमिनीचे GIS आधारित सर्व्हेक्षण व भूमापन करणेबाबतची योजना गावठाण जमाबंदी प्रकल्प,मा.ग्रामविकास विभाग,मा.जमबांदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख(म.राज्य)पुणे यांचे कार्यालय व भारतीय सर्व्हेक्षण विभाग,डेहराडून यांच्या संयुक्त सहभागाने राबविण्यात येत आहे.  सदर योजना केंद्र शासनाचे स्वामीत्व योजना या नावाने सुरु केलेली आहे.

गडचिरोली जिल्हयाती स्वामीत्व योजना गावठान भूमापन करणे.

   गडचिरोली जिल्हयात एकुण 1685 गावे असून 1512 गावांचे ड्रोन द्वारे सर्वेक्षण करुन प्रत्येक व्यक्तीस त्यांचे घराचे सनदाच्या स्वरुपात पूरावे उपलब्ध करुन देण्याबाबत ही नाविन्यपूर्ण योजना आहे. याची सुरुवात गडचिरोली जिल्हयात वडसा तालुक्यापासून करुन संपूर्ण जिल्हयात योजना राबविण्यात येत आहे.