योजना व प्रकल्प


कॉर्स प्रणाली

Image related to the scheme or project

                              CORS (Continuously Operating Reference Station) ही भूमापनाची प्रगत प्रणाली आहे. भारतीय सर्वेक्षण संस्था (Survey of India)यांनी संपूर्ण देशामध्ये  कॉर्स नेटवर्क स्थापन करण्यास सुरुवात केलेली असून त्यापैकी 77 CORS स्थानके राज्यात स्थापन झाली आहेत. तसेच विभागात GNSS रोव्हर्स खरेदी केले जात असून त्यांच्या मदतीने रिअल टाइम डेटा प्राप्त करून घेऊन जमिनीची मोजणी केली जाईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथील शासकीय तंत्रनिकेतन परिसरात CORS station कार्यान्वीत करण्यात आले असून प्रत्येक तालुक्यास एक याप्रमाणे एकूण 8 रोव्हर्स खरेदी करण्यात आले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अचूक व जलद मोजणी करण्याच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा भूमि अभिलेख ने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे. आठही तालुक्यांमध्ये रोव्हर्सच्या सहाय्याने मोजणी काम प्राधान्याने करण्यात येत आहे. यामुळे प्रलंबित मोजणी प्रकरणांचा निपटारा जलद गतीने होण्यास मदत होणार आहे.