योजना व प्रकल्प
ई नकाशा ( Digitization of Maps)-
ई नकाशा ( Digitization of Maps)-
भूमि अभिलेख विभागाच्या तालुकास्तरावरील उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयात विविध प्रकारचे नकाशे उपलब्ध आहेत. या नकाशांच्या आधारेच जमिनीच्या हद्दी कायम केल्या जातात. त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या या नकाशांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हे नकाशे फार वर्षांपूर्वी तयार केले असल्याने काळाच्या ओघात नष्ट झालेले आहेत, फाटलेले आहेत, गहाळ झालेले आहेत. सबब त्यांचे डिजीटल स्वरुपात संधारण करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे ई नकाशा हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. नकाशांचे संगणकीकरण करणे या कार्यक्रमांमध्ये तालुकास्तरावरील उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयातील फाळणी नकाशे, भूसंपादन नकाशे, बिनशेती नकाशे, टिपण, गटबुक इत्यादी अभिलेखांचे डिजीटायजेशन करण्यात येणार आहे. डिजीटल स्वरूपात तयार झालेले हे नकाशे संकेतस्थळावरून जनतेस पाहणेसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्हयात नकाशांचे डिजीटायझेशनचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.त्याबाबतची प्राथमिक तयारी सुरू करण्यात आलेली आहे.