योजना व प्रकल्प


रोव्हर्सचे प्रशिक्षण

Image related to the scheme or project

रोव्हर्सचे प्रशिक्षण

नावीन्यपुर्ण योजना -

                              अकोला जिल्हयात नावीन्यपुर्ण योजना अंतर्गत  जिल्हानियोजन समिती, यांच्या मान्यतेने एक कोटी निधी रोव्हर्स खरेदी करीता उपलब्ध करून घेतला.  सदर निधीतून अकोला जिल्हयाकरीता दहा रोव्हर्स खरेदी केले. सदर रोव्हर्सचे प्रशिक्षण Altra Solutions कंपनीकडून जिल्हयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले.

उद्दीष्ट :-

                              रोव्हर च्या सहाय्याने मोजणी कामात गती व अचुकता आणणे, तसेच रोव्हर  च्या सहाय्याने मोजणी काम झालेल्या गट / सर्व्हे नंबर च्या कायम खुणाचे अशांश व रेखांश जतन करून पुढील विवीध योजनासाठी त्यांचा वापर करणे.

फायदे :-

                              रोव्हर च्या सहाय्याने होणारे मोजणी काम हे जलद गतीने होणार आहे. त्यामुळे मोजणी करतांना श्रमाची व वेळेची निश्चीतपणे बचत होणार आहे . शेतामध्ये उभ्या असणा-या पिकांमध्ये सुध्दा मोजणी काम करणे सुलभ झालेले आहे. त्यामुळे कार्यालयाकडील मोजणी प्रकरणांचा निश्चित वेळेत  निपटारा करण्यास मदत होणार आहे.