योजना व प्रकल्प


ई-फेरफार (online mutation )

Image related to the scheme or project
  1. ई-फेरफार (online mutation ) :

            राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमातील या कार्यक्रमांतर्गत संगणकीकृत मिळकत पत्रिका व सातबाराच्या डेटाचे युनिकोड रुपांतरण करणे, अद्यावतीकरण करणे, तालुकास्तरावरील महसूल व भूमि अभिलेख कार्यालयाची दुय्यम निबंधक कार्यालयांशी जोडणी करणे या बाबी एकत्रित करून राज्यात ऑनलाईन फेरफार प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याकरिता जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य) पुणे यांनी राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र, पुणे यांचे मदतीने ई-फेरफार ही आज्ञावली विकसित केली आहे. या आज्ञावलीद्वारे दुय्यम निबंधक कार्यालयात मिळकतीची दस्त नोंदणी झाल्यानंतर नोंदणी झालेल्या दस्ताची माहिती आज्ञावलीद्वारे संबंधित तहसील कार्यालय अथवा उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयास प्राप्त होऊन त्या दस्तानुसार तत्काळ फेरफार नोंद घेण्याची कार्यवाही सुरू होते.

            महाराष्ट्र राज्यातील नगर भूमापन झालेल्या भागात मिळकत पत्रिकांच्या व्यवस्थापनाकरीता ई- प्रॉपर्टी कार्ड इन्फॉरमेशन सिस्टीम e-PCIS प्रकल्प दि १/४/२०२१ पासून राज्यभर कार्यान्वीत करणेत आला आहे. तसेच auto trigger mutation कार्यपद्धती २०/१०/२०२१ पासून संपूर्ण राज्यात राबविण्यास सुरवात झाली आहे. याद्वारे दस्त नोंदणी व फेरफार नोंद घेणेची कार्यवाही एकत्रित होत असल्याने नागरिकांस त्यांचे नाव मिळकतीस दाखल करण्याकरिता पुन्हा उपअधीक्षक भूमी अभिलेख/ नगर भूमापन अधिकारी यांचे कार्यालयात जाण्याची गरज पडणार नाही.