योजना व प्रकल्प
स्वामित्व योजना ( गावठाण जमांबदी प्रकल्प ):-
स्वामित्व योजना ( गावठाण जमांबदी प्रकल्प ):-
राज्यातील सर्व गावांच्या गावठाणामधील जमिनींचे GIS आधारित सर्वेक्षण व भूमापन करणे बाबतचा गावठाण जमाबंदी प्रकल्प ग्रामविकास विभाग, जमाबंदी आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय व भारतीय सर्वेक्षण विभाग डेहराडून यांच्या संयुक्त सहभागाने स्वामित्व योजने अंतर्गत राबविण्यात येत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात स्वामित्व योजन अंतर्गत ड्रोन व्दारे सर्वेक्षण चंद्रपूर तालुक्यात प्रथमत: सुरु करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर श्री. अजय गुल्हाने, निवासी जिल्हाधिकारी चंद्रपूर श्रीमती विद्युत वरखेडकर, उपविभागीय अधिकारी चंद्रपूर श्री. रोहन घुगे, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख चंद्रूपर श्री. प्रमोद घाडगे, भारतीय सर्वेक्षण विभागाचे श्री. ईल्लु मलाईसर, तसेच ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते. चंद्रपूर जिल्ह्यात ड्रोन व्दारे सर्वेक्षण काम पुर्ण झाले असून, गावठाण मिळकतीचे चौकशी काम प्रगतीपथावर आहे.