योजना व प्रकल्प


प्रशिक्षण- Geographical Information system

Image related to the scheme or project

                     मा. श्री एन. सुधांशु साहेब,जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (महा.राज्य) पूणे यांचे संकल्पनेतून राष्ट्रीय स्तरावरील विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगीकी संस्थान, नागपूर (VNIT) येथे Geographical Information system वर आधारीत बेसीक कोर्स एकावेळी 45 अधिकारी, कर्मचारी यांना एकत्रीरित्या पुरविणेत येत आहे. सदर कोर्सच्या आतापर्यंत 9 बॅचेस पूर्ण झाल्या असून यामुळे भूमि अभिलेख विभागास आधुनिक करण्याचे मा. जमाबंदी आयुक्त यांचे स्वप्न पूर्णत्वास येत आहे. बेसीक कोर्स सोबतच ॲडव्हांस कोर्स हैद्राबाद येथे व ARC GIS चे प्रशिक्षण पूणे येथे मा. जमाबंदी आयुक्त यांचे मार्गदर्शनात देण्यात येत आहे.

                    सर्व जिल्हा स्तरावर आधुनिक मोजणी साहित्य रोव्हर (Rover) व लॅपटॉप मा.जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडून पुरविण्यात आलेले आहे व जिल्हा स्तरावर रोव्हर (Rover) चे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात येत असून एकंदरीत भूमि अभिलेख विभागाची वाटचाल आधुनिकते कडे अग्रेषीत होत आहे.