योजना व प्रकल्प
महिला दिनानिमित महिलांच्या नावे मिळकत आहे त्यांना सनद वितरीत करण्यात आले.
जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख नांदेड कार्यालयात नांदेड जिल्हयातील भूमि अभिलेख विभागाच्या महिला कर्मचारी यांना जागतिक महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरण कार्यक्रम व प्रशिक्षण (स्वामीत्व कामाचे प्रशिक्षण व सनद वाटप ) कार्यक्रमाचे आयोजन श्रीमती एस.पी.सेठीया,जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख नांदेड यांचेतर्फे करण्यात आले. त्यावेळी मा. जिल्हाधिकारी नांदेड व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परीषद नांदेड यांची कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थिती होते .तसेच मा.जिल्हाधिकारी नांदेड व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परीषद नांदेड यांच्या हस्ते मौजे पोखर्णी,वाणेगाव,दर्यापुर व थुगाव या गावातील स्वामीत्व योजने अंतंर्गत तयार झालेले सनदाचे ज्या महिलांच्या नावे मिळकत आहे त्यांना सनद वितरीत करण्यात आले.