योजना व प्रकल्प


रोव्हर्स प्रशिक्षण

Image related to the scheme or project

सन 2022 मध्ये रायगड जिल्हयाकरीता नाविन्य योजनेमधून 3 रोवर मशीन प्राप्त झाले. व सिडको पनवेल यांचे तर्फे 3 रोवर मशीन असे एकूण 6 रोवर मशीन प्राप्त झाले. असुन सर्व तालुक्यात रोवर मशीनच्या सहाय्याने मोजणी काम करण्यात येते. रोवरव्दारे मोजणी करतांना बेस लावावी लागत नाही. मोजणी करतांना चुना मार्कींग करून प्रत्येक पॉईंट वर जावून रीडींग घेतले जाते व त्यानुसार मोजणी काम करून डिजीटायझेशन केलेला अभिलेख घेवून मोजणी केलेले काम त्यामध्ये माजी बसविले जाते व हद्द निश्चीत करण्यात येते व हद्दीच्या खुणा अर्जदार यांना दाखविल्या जातात. रोवरव्दारे मोजणीमध्ये वेळेची खुप बचत होते. एका दिवशी 2 ते 3 मोजणी प्रकरणे सहज मोजणी करता येतात. वेळेची बचत ‍ होते व कामात सुलभता येते. सदयस्थितीत रायगड जिल्हयामध्ये जमीन मोजणी संबधी आधुनिक तंत्रज्ञान रोवर मशीन वापरून मोजणीचे काम करण्यात येते.