योजना व प्रकल्प


जिवती तालुक्यातील सिमा वादातीत 14 गावाचे जमीन मोजणी काम:-

Image related to the scheme or project

जिवती तालुक्यातील सिमा वादातीत 14 गावाचे जमीन मोजणी काम :-  

                        दिनांक ०१/०९/२०२२ रोजी मौजा मुकदमगुडा ता. जिवती येथे महाराष्ट्र-तेलंगाना सिमेवरिल वादातीत आठ गावे व सात वाडयाच्या मोजणीच्या अनुषंगाने ग्रामसभा मध्ये राजुरा विधानसभा आमदार मा. श्री. सुभाष धोटे, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख चंद्रपूर श्री. प्रमोद घाडगे, मा. गटविकास अधिकारी जिवती, उपअधीक्षक भूमि अभिलेख जिवती, तसेच सरपंच मुकदमगुडा हे उपस्थित होते, त्यांनी ग्रामसभेस मार्गदर्शन करुन मोजणी कामी मदत करण्याचे आवाहन केले.

                                मौजा मुकदमगुडा येथून सदर मोजणी कामास दिनांक 15/09/2022 पासून सुरुवात झाली आहे. उर्वरित गावाचे मोजणी काम सुरु आहे.