योजना व प्रकल्प
अभ्यागत कक्ष.
जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख सिंधुदुर्ग कार्यालयाचा सर्व सोयीनियुक्त अभ्यागत कक्ष
महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही शासकीय कार्यालयात नागरिकांना कोणत्या ना कोणत्या कामानिमित्त कधीतरी जावे लागते. त्यावेळेस नागरिकांना वेगवेगळया प्रकारचे अनुभव येत असतात. कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची एक माफक अपेक्षा अशी असते की, ‘माझे काम कोणत्या स्तरावर आहे तसेच मला माझे काम करून घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात व माझे काम साधारणपणे कधीपर्यंत होईल?’ या प्रश्नांची उत्तरे त्याला कार्यालयात येवून शोधावी लागतात. परंतू जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, सिंधुदुर्ग कार्यालयात कोणत्याही नागरीकाने कामानिमित्त प्रवेश केल्यानंतर त्याच्या वरील प्रश्नांची उत्तरे तर ताबडोतोब मिळतात व त्याकरिता कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी नेहमी तत्पर असतात. याशिवाय या कार्यालयात एक अनोखी बाब अनुभवयास आज मिळत आहे. ती म्हणजे जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख सिंधुदुर्ग यांचा अद्यावत व सर्व सोयी व माहितीनियुक्त अभ्यागत कक्ष.
मा. जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने जिल्हा नियोजन समिती मार्फत दिनांक 31/12/2019 च्या आदेशाने जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयात अभ्यागतासाठी सोयी सुविधा पुरविणेबाबात र.रू. 2,52,000/- (रक्कम रू. दोन लाख बाव्वन्न हजार मात्र) मंजूर करण्यात आलेत. सदर रक्कमेतून अद्यावत अभ्यागत कक्षाकरिता पुढील प्रमाणे वस्तू खरेदी करण्यात आलेल्या आहेत.
अ.क्र. | तपशिल | अ.क्र. | तपशिल |
|---|---|---|---|
1 |
रेफ्रिजरेटर |
7 |
वॉटर कुलर |
2 |
वॉटर प्युरीफायर |
8 |
स्टँड फॅन |
3 |
स्टील बेंच 3 सीटर |
9 |
ऑफिस खुर्च्या |
4 |
टिपॉय |
10 |
टेबल |
5 |
नोटिस बोर्ड |
11 |
सोफा सेट |
6 |
LCD TV |
12 |
प्रोजेक्टर |
कार्यालयाच्या अभ्यागत कक्षामध्ये स्वच्छ व अल्हाददायक वातावरणात नागरिक / अभ्यागतांची बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील आहे. अभ्यागत कक्षामध्ये 15 ते 20 नागरिक / अभ्यागत बसू शकतात. अभ्यागत कक्षाचे वैशिष्टय म्हणजे येथे अभ्यागतांना भूमि अभिलेखाची सर्व अद्यावत माहिती, शासन निर्णय, परिपत्रके, विविध कामाच्या कार्यपध्दती, भूमि अभिलेख विभागाकडून होत असणाऱ्या विविध कामाबाबतच्या कार्यपध्दती बाबतच्या कायदेशीर तरतूदीचे माहिती पुर्ण कार्यालयीन वेळेत अभ्यागत कक्षतील टि.व्ही. वर प्रेझेंनटेशनच्या स्वरूपात दाखविण्यात येते. याचा फायदा कार्यालयात विविध कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना तर झालेलाच आहे. त्याचबरोबर हे जिल्हास्तरीय भूमि अभिलेख विभागाचे कार्यालय असल्याने तालुका स्तरावरील उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी वेळोवेळी या कार्यालयात माहिती सादर करणे कामी येत असतात त्यांना देखील कार्यालयाच्या अभ्यागत कक्षातील सोयीसुविधांचा उपयोग चांगल्या प्रकारे होत आहे.