योजना व प्रकल्प


वनहक्क दावेची रोव्हर व्दारे मोजणी

Image related to the scheme or project

वनखंड मोजणी (वनहक्क दावे )

अनुसुचीत जमाती व इतर पांरपारीक वन निवासी ( अधिनियम) 2006 मध्ये  अस्तित्वात आला आहे. यामध्ये राज्यातील अनुसुचीत जमाती  ज्यांचे वास्तव पिढयान पिढया जंगलात  असुनही त्यांच्या हक्काची कोणत्याही प्रकारची नोंद घेतली  नाही असे वनहक्क नोंदवुन त्यांचे अधिकार  अभिलेख तयार करण्याची रचना करण्यासाठी  हा कायदा तयार करणेत आला आहे .तसेच अमरावती जिल्हयात मेळघाटात  एकुण 2493 वनखंड असुन त्यांचे क्षेत्रफळ एकुण 4,86000 हे. आर. आहे . एका वनखंडाचे सरासरी क्षेत्र  200 ते 1200 हे. आर. दरम्यान आहे. मेळघाटातील वन जमिन हया पुर्ण सर्व्हेक्षण न झालेली जमिन (UNSURVEYED  LAND) असुन त्याचा कोणताही नकाशा अधिकार  अभिलेख अथवा इतर अभिलेख  उपलब्ध नाही.

             मेळघाटातील अतिशय दुर्गम भागातील व (UNSURVEYED  LAND) मधील वनहक्क दावे रोव्हर व्दारे मोजण्याचा महाराष्ट्रातील पहिला यशस्वी प्रयोग अमरावती भूमि अभिलेख विभागातील नियुक्त कर्मचा-यांच्या  पथकाने यशस्वी रित्या पूर्ण केलेला आहे.सदर मोजणी मुळे मेळघाटातील वनहक्क धारकांना त्यांच्या मालकी हक्का संबंधीचा दस्ताऐवज (अनुसूची जे ) व मोजणीचा नकाशा मिळालेला आहे .