योजना व प्रकल्प


ई - अभिलेख (scanning of records )

Image related to the scheme or project

- अभिलेख (scanning of records )

            उपअधीक्षक भूमी अभिलेख व तहसीलदार यांच्या कार्यालयातील अभिलेख कक्षात असलेल्या जुन्या अभिलेखांचे उतारे नागरीकांना दैनंदिन कामासाठी लागतात. हे जुने अभिलेख शोधुन त्यांचे उतारे देणे हे जिकिरीचे व वेळखाऊ काम आहे. याकरीता नागरीकांना कार्यालयात वारंवार पाठपुरावा करावा लागतो. यावर उपाययोजना करणेसाठी   “ई - अभिलेख”  या प्रकल्पाव्दारे अभिलेख कक्षाचे संगणकीकरण करणेत आले आहे. या प्रकल्पांतर्गत तालुका स्तरावरील उपअधीक्षक भूमी अभिलेख व तहसीलदार कार्यालयातील अभिलेखांचे स्कॅनिंग करण्यात आले असून ते डिजीटल स्वरुपात साठविण्यात आलेले आहेत. याकरीता अभिलेखांचे स्कॅनिंग करणे, स्कॅनिंग झालेल्या अभिलेखांची साठवणूक करणे व मागणीनुसार नागरीकांस या अभिलेखांचे प्रिंट आउट पुरविणे याकरीता जमाबंदी आयुक्त, पुणे कार्यालयाकडून आज्ञावली विकसीत करण्यात आली आहे. त्याच बरोबर स्कॅनिंग केलेले अभिलेख https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर पहाण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आले  आहेत.

उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडील स्कॅनींग करण्यात आलेले विविध प्रकारचे अभिलेख

गावानुसार टिपण, गुणाकार बुक, आकारफोड, क.जा.प, आकारबंद (मूळ, दशमान, गटवार, वाडी विभाजन योजनापत्रक / एकत्रिकरण योजना नोंदवही/ दुरुस्ती योजना/ शुध्दीपत्रक, एकत्रिकरण जबाब धारिका, शेतपुस्तक, वसलेवार बुक, कच्चा सुड, एकत्रिकरण गांव पी.सी, क्षेत्रबुक, ताबेपावती इत्यादी  अभिलेख उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयाकडील स्कॅनिंग केलेले आहेत.

          तहसीलदार कार्यालयाकडील स्कॅनींग करण्यात आलेले विविध प्रकारचे अभिलेख

जुने 7/12, जुने फेरफार नोंदवही, चालू खाते उतारा (गां.न.नं 8अ), क ड ई पत्रक, ईनाम पत्रक, जन्ममृत्यू रजिष्टर इत्यादी अभिलेख स्कॅनिंग केलेले आहे.