योजना व प्रकल्प
ई-मोजणी – मोजणी प्रकरणांचे व्यवस्थापन
ई-मोजणी आज्ञावलीच्या व्हर्जन 1.0 च्या वापरामुळे विभागातील अधिकाऱ्यांना मोजणी अर्जावर अचूकपणे प्रक्रिया करण्यास मदत झालेली आहे. तसेच नागरिकांना मोजणीची तारीख, मोजणीची वेळ, भूकरमापकाचे नाव, मोजणी फी इत्यादी महत्वाची माहिती त्यांनी अर्ज करताच मिळते. या आज्ञावलीच्या वापरामुळे विभागातील अधिकाऱ्यांना मोजणीचे चलन तयार करणे आणि मोजणी फी संकलनाचा आढावा घेण्यास मदत झालेली आहे. या आज्ञावलीमध्ये ऑनलाईन एमआयएसची सुविधा असून त्याच्या मदतीने विभागातील अधिकाऱ्यांना मोजणी प्रकरणांची संख्या, प्रलंबित प्रकरणांची संख्या, जमा झालेला महसूल, मोजणी प्रकरणांबाबतची स्थिती इत्यादि माहिती समजते. या आाज्ञावलीमधून दरवर्षी सरासरी 1.75 लाखांपेक्षा जास्त मोजणी प्रकरणांचे व्यवस्थापन केले जाते.