योजना व प्रकल्प
रोव्हर्स द्वारे मोजणी
जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख नांदेड यांचे अधीनस्त उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयांना जिल्हा नियोजन समीती नांदेड यांचेकडून नाविन्य पूर्ण योजने अंतर्गत प्राप्त निधीतून 12 रोव्हर्स खरेदी करण्यात आले आहेत. जिल्हयातील अधिनस्त कार्यालयातील अधिकारी /कर्मचारी यांना रोव्हर्स द्वारे मोजणी करण्याचे प्रशिक्षण दि.01.06.2022 व दि.02.06.2022 रोजी मा. जिल्हाधिकारी नांदेड यांचे अध्यक्षतेखाली जिल्हयातील तालुक्यांना रोव्हर्स वाटप करण्यात आले व 50 कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले. जलद व अचुकरीत्या मोजणीसाठी रोव्हर्स उपयुक्त ठरणार आहे.माहे जुन 2022 पासुन रोव्हर्स द्वारे मोजणीचे काम सुरु झाले आहे.